शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जोमाने कामाला लागा : राजेश क्षीरसागर* *शिवसेना नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर*

Spread the news

*शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जोमाने कामाला लागा : राजेश क्षीरसागर*

  1. *शिवसेना नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर*

कोल्हापूर दि.०५ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांची शिवसेना शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस राज्यभरातील जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत असून त्याचा परिपाक महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढल्याचेही निकालात स्पष्ट दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे. त्यामुळे शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नियोजनबद्धरित्या जोमाने कामाला लागा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. शिवसेना पक्षाच्या जिल्हास्तरीय विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेनेच्या वतीने पुढीलप्रमाणे पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेनेत शिवसैनिक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपशहरप्रमुख या पदांवर काम करून आपल्या कामातून शिवसेना संघटनात्मक बांधणीचे संघटन कौशल्य दाखविणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देण्यात आला आहे. यामध्ये उप जिल्हाप्रमुख पदावर राजारामपुरी विभागातून दीपक चव्हाण, मुक्तसैनिक कदमवाडी जाधववाडी रुईकर कॉलनी विभागातून विनय वाणी, ताराबाई पार्क नागाळा पार्क विभागातून राज जाधव, मंगळवार पेठ विभागातून रणजीत मंडलिक, लक्ष्मीपुरी विभागातून सुनील खोत, सदर बाजार विचारेमाळ विभागातून राहुल चव्हाण, तर उपशहरप्रमुख पदावर मंगळवार पेठ विभागातून विश्वनाथ माळकर, मुक्तसैनिक जाधववाडी विभागातून यशवंत उर्फ बंडा माने, प्रतिभानगर शास्त्रीनगर सम्राटनगर विभागातून नजीर पठाण आणि विभागप्रमुख पदासाठी मुक्तसैनिक वसाहत विभागातून अजिंक्य भास्कर पाटील व शाहुमील कॉलनी पांजरपोळ विभागातून अजिंक्य पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांच्या शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भगवी घौडदौड सुरु करण्याचा मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी निर्धार केला असून, त्या अनुषंगाने शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजली गेली असून, लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेस अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. पण, शिवसैनिकांनी केलेला संघर्ष विरोधकांच्या मतांवर परिणामकारक ठरला आहे. या पराभवाने खचून न जाता शिवसेनेने पुन्हा नव्याने उभारी घेतली आहे. आगामी काळात संघटनात्मक बांधणीसह निवडणुकीच्या दृष्टीने बूथवाईज लक्ष केंद्रित करून नियोजनबद्ध रित्या निवडणुकीस सामोरे जाणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरसाठी भरभरून निधी दिला आहे. याची प्रसिद्धी करण्यात आपण कमी पडणार नाही याची दक्षता घ्या. येणारी विधानसभा पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, शिवसेनाप्रमुखांचे विचारांनी अखंडीत जनसेवा करणारे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांसह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. आगामी काळात पक्ष बांधणी साठी शिवदूतांची नेमणूक करावी, शाखांची उद्घाटने करावीत, विभागवार शिवसैनिकांचे मेळावे घेण्याच्या सूचना केल्या.

*उत्तर, दक्षिण, करवीर शिवसेनेचे बालेकिल्ले : श्री.राजेश क्षीरसागर*
विधानसभा मतदारसंघाचा विचार करता कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. या मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात शिवसेनेची ताकत आहे. याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत येत आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेची ताकत दिसून येईल. वरिष्ठांच्या सुचनेनुसार पुढील काळातील निवडणुकीचे निर्णय होतील. पण, शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच जनसंपर्कावर भर द्यावा. येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून देण्याची जबाबदारी स्विकारून काम करु, असेही श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, महानगरसमन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, शिव उद्योग सहकार सेना शहरप्रमुख मंगलताई कुलकर्णी, युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले, पूजा कामते, सुनिता भोपळे, प्रीती अतिग्रे, राधिका पारखे, सना शेख, पूजा आरदांडे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, अनुसूचित जाती सेना जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, फेरीवाले सेना शहरप्रमुख विजय जाधव, अल्पसंख्याक सेना संपर्कप्रमुख रियाज बागवान, उपशहरप्रमुख टिंकू देशपांडे, सुरेश माने, रविंद्र पाटील, प्रदीप मोहिते, धनाजी कारंडे, अशोक राबाडे, विकास शिरगांवे, सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक आदी उपस्थित होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!