कुंभी कासारी वरील कोविड सेंटरला विरोध करणाऱ्या नरकेना आत्ताच जनतेचा कळवळा कसा? राजेंद्र सूर्यवंशी यांचा सवाल

Spread the news

कुंभी कासारी वरील कोविड सेंटरला विरोध करणाऱ्या नरकेना आत्ताच जनतेचा कळवळा कसा?
राजेंद्र सूर्यवंशी यांचा सवाल
कळे
.कोरोना महामारीच्या काळात स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्यासह आम्ही व असंख्य कार्यकर्ते जनतेचे जीव वाचवण्यात व्यस्त होतो .यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके हे कुठेही दिसत नव्हते .कुंभी कासारी साखर कारखाना परिसरात मी स्वतः कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू केले असता त्याला विरोध करणारे यांना जनतेचा कळवळा आताच कसा आला आहे असा खडा सवाल करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला .
. कळे जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती .नरके यांनी करवीर मतदारसंघ भकास केला असून कुंभी कासारी कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे त्यांना विकासाच्या गप्पा मारायचा नैतिक अधिकार नाही .निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते बिन बुडाचे आरोप करत असून करवीर चा स्वाभिमानी मतदार त्यांना जागा दाखवल्याशिवाय गप बसणार नाही असेही सूर्यवंशी यांनी सांगितले .
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके यांनी धामणी धामणी प्रकल्पातील अडचणी दूर करून त्याला भरीव निधी निधी उपलब्ध करून देण्याचे काम पी एन पाटील यांनी केलेले आहे .त्यामुळे तेच ह्या प्रकल्पाचे खरे शिल्पकार आहेत .राहुल पाटील यांना मिळणारा उस्फुर्त पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित आहे .मतदारांनी कोणत्याही भूल थापाना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी बोलताना विलास पाटील यांनी स्वर्गीय आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी अवघ्या पाच वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघात विकास काय असतो हे दाखवून दिले .चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे लोकांना केवळ फसवण्याचे काम केलेले आहे .या मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद केवळ राहुल पाटील यांच्याकडेच असून चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे केवळ भूल थापा लावण्याचे काम केलेले आहे .यावेळी पन्हाळ्यातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.त्यामुळे पन्हाळा तालुक्यातून राहुल पाटील यांना निर्णायक व विजयी मताधिक्य देऊ असे सांगितले .

यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनीस्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी अवघ्या पाच वर्षात करवीर मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला असून धामणी प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आगामी काळात हा मतदार संघ राज्यात आदर्श बनवण्यासाठी मी वचनबद्ध असून सर्वांनी भरघोस मताधिक्य देऊन आशीर्वाद द्यावा मी आजन्म आपला सेवक म्हणून कार्यरत राहील असे प्रतिपादन केले .

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मोळे, हंबीरराव चौगले शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश पोवार,विलास पाटील कळे, रणजित पाटील,ज्ञानदेव कांबळे काटेभोगाव,यांची भाषणे झाली.
यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,संभाजी पाटील(तात्या),गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मोळे,सुरेश पाटील , एस के पाटील ,पी.डी.पाटील,,सुनील पाटील,माजी सभापती बंकट थोडगे ,रणजित पाटील,शंभूराजे पाटील,शंकर राबाडे,बापू गिरीबुवा,शामराव पाटील,तसेच ए.डी.पाटील),रघुनाथ आवळेकर,,सरदार पाटील,केरबा पाटील,डॉ कोल्हे,अनिल पोवार,संदीप टिक्के,शिवाजी पाटील,कृष्णनाथ कदम,सीताराम सातपुते,, शहाजी चव्हाण युवराज पाटील(सर),निवास पाटील(सर),सतीश मोळे,बाजीराव पाटील,किरण पाटील, मनोज पाटील,पांडुरंग जाधव यांच्यासह मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मनोज पाटील यांनी मानले
चौकट
काटेभोगाव येथील कार्यकर्त्यांचा चंद्रदिप नरके ना जय महाराष्ट्र !
काटेभोगाव येथील नरके गटाचे कार्यकर्ते ज्ञानदेव कांबळे प्रणिता कांबळे बाजीराव कांबळे
धिरज आंग्रे शशीकांत कांबळे
श्रीकांत कांबळे गजानन कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नरके गटाला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे नरके गटाला मोठा धक्का बसला आहे

फोटो
कळे जिल्हा परिषद मतदार संघातील मेळाव्यात बोलताना राजेंद्र सूर्यवंशी व्यासपीठावर गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके राहुल पाटील सडोलीकर विलास पाटील व कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील बाळासाहेब मोळे आदी


Spread the news

You may also like

error: Content is protected !!