कागल प्रतिनिधी.
सहकारमहर्षी स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या आशीर्वादाने शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील शतकमहोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे को-आॕप.बँकेच्या चेअरमनपदी सौ.नवोदितादेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली.तर व्हा.चेअरमनपदी उमेश सावंत यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या प्रधान कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.समीर जांबोटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली.पश्चिम महाराष्ट्रातील नागरी बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या राजे बँकेची सलग पाचवी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे.
चेअरमनपदासाठी सौ.नवोदिता घाटगे यांच्या नावासाठी एम.पी.पाटील सुचक तर नम्रता कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी उमेश सावंत यांना रवी घोरपडे सुचक तर अरुण गुरव यांनी अनुमोदन दिले.
यावेळी नुतन पदाधिका-यांचा सत्कार माजी अध्यक्ष तथा संचालक एम्. पी. पाटील यांचे हस्ते झाला. तसेच बँकेचे मार्गदर्शक व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचे हस्ते निवडणूक निर्णय अधिकारी डाॕ. समीर जांबोटकर व माजी अध्यक्ष तथा संचालक एम. पी. पाटील यांचा सत्कार करणेत आला.
यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व नुतन चेअरमन सौ. नवोदिता घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बँकेचे संचालक रविंद्र घोरपडे, रणजित पाटील, दत्तात्रय खराडे, दिपक मगर, संजय पाटील, प्रकाश पाटील, अरूण गुरव,संजय चौगुले,राघू हजारे, प्रविण कुऱ्हाडे वड्ड,अमर चौगले, अमोल शिवई,सुशांत कालेकर, संचालिका सौ. नम्रता कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण पाटील, जनरल मॅनेजर हरिदास भोसले व बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
माजी अध्यक्ष तथा संचालक एम. पी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले
चौकट
शाहू ग्रुपकडून असाही महिला सन्मान
सहकार महर्षी स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नावारूपास आलेल्या शाहू ग्रुपमधील शाहू साखर कारखाना व राजे बँक या महत्त्वाच्या संस्था आहेत. शाहू साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यानंतर आता राजे बँकेच्या चेअरमनपदी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे यांची निवड झाली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शाहू ग्रुपकडून शाहू साखर कारखान्यानंतर राजे बँकेची धुरा सौ. नवोदितादेवी घाटगे यांच्याकडे सोपवून नारीशक्तीचा सन्मान केला आहे.