कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या नुतनीकरणासह विविध पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर,
राजर्षि शाहू जलतरण तलावाच्या दुरूस्तीसाठी अडीच कोटी रूपये मंजूर,
युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची माहिती
, पक्षानं संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्टीकरण
कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांचं डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण हेावून नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते मिळावेत. त्याचप्रमाणं सभागृह, बगीचा, विरंगुळा केंद्र यासारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी. यासाठी राज्य शासनाकडं पाठपुरावा करून, आपण २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केलाय. तसंच महापालिकेच्या राजर्षि शाहू जलतरण तलावाच्या दुरूस्ती आणि सुशोभिकरणासाठी अडीच कोटी रूपयांचा निधी मंजूर झालाय, अशी माहिती युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. वरिष्ठांनी आणि पक्षानं आदेश दिल्यास आपण निवडणूक लढवायला तयार आहोत, असंही कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं.
कोल्हापूर शहरासाठी कृष्णराज महाडिक यांनी २५ कोटी रूपयांचा निधी आणलाय. याबाबतची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. व्हिडीओ ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार्या उत्पन्नाचा विनियोग समाजातील गरजू आणि गरीब कष्टकरी लोकांसाठी करताना, जिल्हयाचे सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या अपेक्षा यांचा अभ्यास आपण केलाय. त्यातून कोल्हापूर शहराच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न आपल्या निदर्शनाला आला. तर शहराच्या कचरा उठावाची समस्याही तीव्र स्वरूप धारण करत आहे. कचरा उठावाचा प्रश्न समजून घेण्यासाठी कसबा बावडा इथला झुम प्रकल्प आणि पुईखडी इथं कचर्यापासून वीज निर्मिती करणार्या प्रकल्पाला आपण भेट दिली. तर महापालिकेची कचरा उठाव सिस्टीम समजून घेण्यासाठी कर्मचारी म्हणूनही काम केलं. त्यातून अनेक प्रश्न आणि समस्या आपल्या निदर्शनाला आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं पहिल्या टप्प्यात रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केलाय. त्यामध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील २७ प्रभाग आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील २३ विभागांसाठी मिळून २५ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. या निधीतून या प्रभागातील रस्ते चकाचक बनवले जाणार आहेत. तसंच या रस्त्यांवर आपलं बारकाईनं लक्ष राहणार आहे, त्याचप्रमाणं शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचं कंत्राट आयआरबीसारख्या मोठया कंपनीला देवून, ते रस्ते कायमस्वरूपी दर्जेदार बनवावेत, असा प्रस्ताव महापालिकेला दिल्याचंही कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं.
बाईट – कृष्णराज महाडिक, युथ आयकॉन
तर पुईखडी इथल्या कचर्यापासून वीज निर्मिती करणार्या केंद्रात अतिरिक्त वीज तयार होते. ती नागरिकांना द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेला दिला. वेस्ट मॅनेजमेंटवर काम करणार्या अनेक कंपन्यांनी आपल्याशी संपर्क साधलाय. कचरा उठाव आणि त्यावर प्रक्रिया करण्याचं काम त्या कंपन्या करतील, शिवाय महापालिकेलाही त्यातून उत्पन्न मिळेल. सध्या ३ ते ४ लाख टन कचरा पडून आहे. त्यातच महापालिकेचे कर्मचारी काम करतायत. या कचर्यातून बाहेर पडणार्या घातक रसायनांमुळं कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळं त्या कचर्यावर तातडीनं प्रक्रिया करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महापालिका संचलित भिमा स्विमिंग टँकच्या देखभाल दुरूस्ती आणि नुतनीकरणासाठी अडीच कोटी रूपये मंजूर झाले आहेत. या निधीतून या ठिकाणी भिमा स्विमिंग स्पोर्टस अॅकॅडमी सुरू करण्याचा आपला मानस आहे. तसंच या स्विमिंग पुलवर भविष्यात राष्ट्रीय स्पर्धाही घेणार असल्याचं कृष्णराज यांनी स्पष्ट केलं. रस्त्याचं आणि स्विमिंग पुलचं काम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही महाडिक यांनी स्पष्ट केलं. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमामधून येत आहेत. पण आपण समाजकारणावर लक्ष केंद्रीय केलंय. विधानसभेसाठी पक्षानं आदेश दिला आणि वरिष्ठांनी सूचना दिली आणि संधी मिळाली तर आपण निश्चित निवडणूक लढवू, असंही त्यांनी सांगितलं.
पहिल्या टप्प्यामध्ये २५ कोटी रूपयांचा निधी आणलाय. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी मदत केल्याचं कृष्णराज महाडिक यांनी नमुद केलं. भविष्यातही कोल्हापूर शहरासाठी अनेक विकासाचे प्रकल्प राबवण्याचा आपला मानस असल्याचं कृष्णराज यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला नंदकुमार मोरे, किरण नकाते, रूपाराणी निकम, विलास वास्कर, श्रीकांत बनछोडे, उमा इंगळे, बाबा पार्टे, संग्राम निकम, संजय निकम, उदय शेटके यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.