राहूल यांचा विजय हीच पी.एन. पाटील यांना खरी आदरांजली
खासदार शाहू महाराज यांचे आवाहन, बंकट थोडगेंचा राहूल यांना पाठिंबा
गद्दारीला गाडणे हाच शिवसेनेचा अजेंडा ….सहसहसंपर्कप्रमुख विजय देवणे
कोल्हापूर
काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता म्ह्णून आमदार पी.एन. पाटील यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. या आपल्या लाडक्या नेत्याच्या सुपूत्राला विधानसभेत पाठवणे हीच आपली खरी जबाबदारी आहे, तीच पी.एन. पाटील यांना खरी आंदराजंली ठरेल असे मत खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केले. चंद्रदिप नरके यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे या गद्दारीला गाडणे हाच शिवसेनेचा अजेंडा आहे असे मत सहसहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केले. दरम्यान, यावेळी बंकट थोडगे यांनी नरके गटाला रामराम करत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.
असळज येथे झालेल्या प्रचंड जाहीर सभेत शाहू महाराज यांनी राहूल पाटील यांनी विजयी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, पी.एन. यांनी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी पायाला भिंगरी बांधली. त्यामुळे आपणास सत्तर हजाराचे मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या सोबत राहिलात, त्याचप्रमाणे या निवडणुकीत राहूलच्या पाठिशी रहा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे असून पी एन पाटील यांच्या सारखा निष्ठावंत नेता गेल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे राहुल पाटील यांना ७५ हजारांचे मताधिक्य देऊन महाराष्ट्रात विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले .
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पी पाटील यांनी स्वर्गिय पी एन पाटील यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने सतेज पाटील यांनीच आधार दिला असून पी एन पाटील हे शेतकऱ्यांचे कैवारी होते .विधान सभेच्या माध्यमातून कर्जमाफी प्रोत्साहनपर अनुदान काळम्मावाडीचा गळतीचा प्रश्न धामणी धरणाचा प्रश्न या सारख्या असंख्य प्रश्नावर आवाज उठवून न्याय द्यायचे काम केले असे सांगितले . पी एन पाटील यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतयंत्रातून आशिर्वाद द्या जन्मभर तुमचा सेवक म्हणून कार्यरत राहीन असे आवाहन त्यांनी केले .
आ . जयंत आसगावकर यांनी स्वर्गीय पी एन पाटील हे पुज्य व वंदनिय नेते होते राहुल पाटील यांचा विजय हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले .
यावेळी बोलताना शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनीपी एन पाटील हे विकासाचे नायक होते व निष्ठेचे आयकॉन होते .तर चंद्रदिप नरके यांनी शिवसेनेशी गद्दारी केली होती या गद्दारीला गाडणे हाच शिवसेनेचा अजेंडा आहे . राहुल पाटील यांना सत्तर हजार मतांनी विजयी करून पी एन यांना श्रद्धांजली वाहुया असे सांगितले .
थोडगेंसह शिवसैनिकांचा नरकेना जय महाराष्ट्र
पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह यावेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला .तसेच असंडोली येथील शिवसेनेचे विलास देसाई सुभाष देसाई सदाशिव नाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला .या सर्वांनी नरकेना जय महाराष्ट्र केल्यामुळे आई निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार चंद्रदिप नरके गटाला भगदाड पडले असून त्यांना जबरदस्त हादरा बसला आहे .