राहुलला आमदार करायचंच… त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
सतेज पाटील यांचा असळजच्या प्रचंड गर्दीच्या सभेत शब्द
असळज
करवीर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील आणि ऋतुराज पाटील हे दोन्ही माझे पुतणे आहेत, त्यामुळं राहूलला आमदार करायचंच.. त्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्या अशी भावनिक साद आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुक्यात झालेल्या ज्ंगी प्रचार सभेत घातली. याला सर्व उपस्थित जनसमुदायाने हात उंचावत साथ देण्याची हमी दिली.
असळज ता .गगनबावडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पी पाटील सडोलीकरयांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या विराट जाहीर सभेत ते बोलत होते .सभेच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे होते .आजच्या राजकारणातले फोडाफोडी पाहता स्वर्गीय पी एन पाटील यांची निष्ठा किती मोठे होते याची आपल्याला जाणीव होते .राहुल पाटील यांच्याकडे करवीरच्या विकासाची दृष्टी आहे .त्यांना आमदार केल्या शिवाय गप्प बसणार नाही . तुमचा भाऊ मुलगा या नात्याने राहुल पाटील यांना ओट्यात असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ .सतेज पाटील यांनी केले .
आमदार पाटील म्हणाले, राहूल यांच्या पाठीशी निष्ठेचे पाठबळ स्वर्गीय पी एन पाटील यांचे व तुमचे आशीर्वादआहेत त्यामुळे राहुल यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसायचं नाही असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक ही स्वाभिमानाची लढाई असूनजे कोल्हापूरच्या मातीशी एकनिष्ठ राहिले नाहीत ते तुमच्याशी कधीच एकनिष्ठ राहणार नाहीत .स्वर्गीय पी एन पाटील यांच्या निधनामुळे राहुल पाटील हे पोरके झाले असले तरी त्यांना त्यांची कमतरता कधीही भासू देणार नाही .ऋतुराज पाटील यांच्याप्रमाणेच राहुल पाटील व माझे नाते असून करवीरच्या विकासाचा चेहरा राहुल पाटील हेच आहेत त्यामुळे त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ सतेज डी पाटील यांनी केले
आपल्या भाषणात पुढे बोलताना आमदार पाटील यांनी आगामी पाच वर्षातील राहुल पाटील यांच्या पाठीशी निष्ठेचे पाठबळ स्वर्गीय पी एन पाटील यांचे व तुमचे आशीर्वादआहेत त्यामुळे राहुल यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसायचं नाही असे त्यांनी सांगितले.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये देण्यात येणार असून तीन लाखापर्यंत ची कर्जमाफी केली जाईल तसेच नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाईल त्याचबरोबर ३०० युनिट वीज वापरा पैकी पहिल्या १०० युनिटला बील आकारले जाणार नाही .त्यामुळे राहुल पाटील यांना जिल्ह्यात विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले .
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी शाहू राजांच्या कोल्हापूर मध्ये विखारी राजकारण चालू असून हे राजकारण हाणून पाडण्यासाठी महाविकास आघाडी व राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे सांगितले . राहुल पाटील यांना विजयी करून पी एन पाटील यांना आदरांजली वाहुया असे सांगितले . प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी केले यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके माजी सभापती बंकट थोडगे भगवान पाटील मानसिंग पाटील प्रकाश पाटील यांची भाषणे झाली .
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील एम जी पाटील गोकुळचे संचालक बयाजी शेळके बाळासाहेब खाडे शेतकरी कामगार पक्षाचे क्रांतिसिंह पवार पाटील बाबासाहेब देवकर भारत पाटील भुयेकर संभाजीराव पाटणकर प्रिया वरेकर तानाजी पाटणकर शालीनी शेळके बी डी कोटकर राजेंद्र सुर्यवंशी दत्ता पाटील प्रकाश देसाई उबाठाचे सतिश पानारी पांडूरंग भोसले आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
पैलवान कच्चा नाही
काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील हे जरी नवीन असले तरी त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव कार्य केलेले आहे .त्यांच्या पाठीशी स्वर्गीय पी एन पाटील यांचा निष्ठावंत वारसा आणि आशीर्वाद तसेच जनता जनार्दनाची साथ आहे त्यामुळे पैलवान कच्चा नाही असे आ पाटील यांनी सांगितले.