राहुल पाटील यांचा विक्रमी मताधिक्याने विजय हीच पी एन पाटील यांना श्रद्धांजली
आमदार सतेज पाटील
खुपिरे तील विराट प्रचार सभेत आवाहन
कोपार्डे :
स्वर्गिय श्रीपतराव बोन्द्रे यांच्यानंतर करवीर वासियांची अस्मिता स्व.आमदार पी.एन.पाटील यांनीच जोपासली होती करवीरच्या विकासाचे तेच खरे शिल्पकार होते. कार्यकर्त्याना स्वाभिमानाने उभे करणारे पी एन पाटील अचानक निघुन गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या रक्ताचे व विचाराचे वारसदार राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून पी एन यांना श्रद्धांजली वाहुया असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ सतेज पाटील यांनी केले .
करवीर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल पी.एन.पाटील यांच्या प्रचारार्थ खुपिरे (ता.करवीर) येथे आयोजित केलेल्या जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्ष स्थानी सुभाना निकम हे होते .सभेला कार्यकर्त्यांच्या गर्दीने सर्व उच्चांक मोडले .
आपल्या भाषणात पुढे बोलताना पाटील यांनी जुना करवीर हा माझा घरचा मतदारसंघ आहे या मतदार संघानेच मला प्रथम आमदार केले त्यामुळेच तुमची सर्व कामे करू शकलो .आता या अडचणी च्या वेळी माझ्या प्रमाणेच राहुल पाटील यांना साथ द्या कोणत्याही दबावाला आमिषाला न घाबरता राहुल पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे सांगितले . राज्यातील भ्रष्ट महायुती च्या काळात महागाईचा आगडोंब उसळला आहे लोकसभा निवडणूकीत पाठीत लाटणे घातल्याने च लाडकी बहिण आठवली असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वच घटकांना न्याय दिला जाईल असे सांगितले .
यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी, महायुती सरकारने अडीच वर्षांत महाराष्ट्राची अधोगती केली असून राज्याची प्रगती करण्यासाठी महाविकास आघाडी च्या पाठीशी रहा आणि करवीर मधून राहुल पाटील यांना प्रचंड मतानी विजयी करा. असे सांगितले
काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी आपल्या भाषणात, स्व.पी.एन.पाटील यांनी करवीरमध्ये गोरगरीबांचे प्रपंच उभे करण्याचे काम केले आहे . आगामी काळात त्यांचाच वारसा घेऊन या मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम देण्यास मी वचनबद्ध असून पी एन पाटील यांच्या कर्तृत्वाला साजेल असे विक्रमी मताधिक्य द्या असे आवाहन केले .
यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबियांच्या पाठीत खंजिर खुपसणारे उद्या तुमच्या पाठीत खंजिर खुपसतील असे सांगून करवीरमध्ये गद्दारांना गाडल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही असे सांगितले .
यावेळी आमदार जयंत आसगावकर, , शेकापक्षाचे क्रांतीसिंह पवार-पाटील,
गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, चेतन नरके माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी,शेकापचे क्रांतीसिंह पवार-पाटील, स्वाभिमानीचे बाजीराव देवाळकर आदींची भाषणे झाली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर बाबासाहेब देवकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष व्ही बी पाटील, अमर पाटील,
हंबीरराव चौगले, राजेंद्र खानविलकर भरत आमते रणजित पाटील पी बी पाटील, आनंदा पाटील, सर्जेराव पाटील, सरदार बंगे, प्रकाश चौगले, प्रवीण पाटील, शिवाजी पाटील, आशा पाटील, तेजस्विनी अ. पाटील यांचेसह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.
फोटो
खुपिरे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पी पाटील यांच्या विराट प्रचारसभेत बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ सतेज पाटील खा छत्रपती शाहु महाराज व राहुल पाटील समोर उपस्थित जनसमुदाय
*****************************”*”””””””