करवीर मधील जनता हेच माझे दैवत
संधी द्या आजन्म सेवक म्हणून काम करेन
सांगरूळ येथील विराट सभेत राहुल पाटील यांचे आवाहन
सांगरूळ
स्वर्गीय पी एन पाटील सडोलीकर यांनी करवीर मतदारसंघातील जनता जनार्दन हेच आपले दैवत मानून त्यांच्या विकासासाठी आपले आयुष्य वाहिले होते .त्यांच्या पश्चात या जनता जनार्दनाच्या पाठबळावरच मी आपल्यासमोर उभा आहे .मी तुमचा सेवक आहे.करवीरच्या विकासाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आशीर्वाद द्या आजन्म तुमचा सेवक म्हणून काम करेनअसे प्रतिपादन करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनी केले .विरोधकांच्या हिनपातळीवरील अपप्रचाराला स्वाभिमानी मतदारच उत्तर देतील असा टोलाही त्यांनी हाणला .
सांगरूळ ता करवीर येथे जाहीर प्रचार सभेत पाटील बोलत होते सभेचे अध्यक्षस्थानी आमदार जयंत आसगावकर हे होते .स्वर्गीय पी एन पाटील यांनी हा मतदार संघ एका कुटुंबा प्रमाणे सांभाळला होता . कोविड काळात त्यांनी रात्रीचा दिवस करून सर्वांना आधार दिला होता .त्यांनी सहकार व राजकारणातून करवीरच्या विकासाला चालना दिली आहे .अगदी शेतकरी कर्जमाफी पासून प्रोत्साहन अनुदान शेतीचे विविध प्रश्न बेरोजगारांचे विविध प्रश्न विधिमंडळात ताकतीने मांडून त्यांना न्याय द्यायचे काम केले आहे .एक संपन्न करवीर चे स्वप्न त्याने पाहिले होते हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी बोलताना मधुरिमराजे छत्रपती यांनीपी एन पाटील यांच्या कष्टामुळे आज जिल्ह्यात पक्ष टिकला आहे .करवीर चे विकासाचे खरेखुरे शिल्पकार्ते होते .लोकसभेला शाहू महाराजांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे .लोकनेता आपल्यातून गेल्यामुळे आपण पोरके झालो आहोत .राहुल पाटील यांना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करणे हीच पी एन पाटील यांना श्रद्धांजली ठरेल असे सांगितले .
यावेळी बोलताना बाळासाहेब खाडे म्हणाले, सांगरुळ गावातील अतिक्रमणे नियमित करण्याची पहिली मागणी स्व.आमदार पी.एन.पाटील यांनी आपल्या कार्यकाळात शासनाकडे केली. कुंभी कारखान्यावर कोविड सेंटर काढायला नरकेंनीच विरोध केला होता .अशांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. नरके आत्ता वैफल्यग्रस्त झाल्यामुळे बेताल वक्तव्ये करत आहेत त्यांना पराभूत करून धडा शिकवा असा घणाघात बाळासाहेब खाडे यांनी केला.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, बाबासाहेब देवकर, दादू कामिरे, बाजीराव देवाळकर, प्रा.टी.एल.पाटील, बाजीराव खाडे, निवास सडोलीकर, प्रकाश मुगडे, कृष्णात चाबूक यांची भाषणे झाली.
यावेळी गोकुळचे संचालक विश्वास पाटील, विजय देवणे, सरपंच शीतल खाडे, एम.आर.पाटील, अमर पाटील, निवृत्ती आबा चाबूक, शामराव सुर्यवंशी, सचिन पाटील, विष्णू पाटील, सीमा चाबूक, अर्चना खाडे, नंदकुमार पाटील, गुणाजी शेलार, ए.डी.माने, भगवान पाटील यांच्यासह विक्रमी संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
चौकट
भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी, आमच्या भोगावती पेक्षा कुंभी साखर कारखान्याची अवस्था अतिशय वाईट आहे. कुंभे कारखाना खड्ड्यात घालण्याचे काम नरके यांनी केले आहे .लबाड बोलून दिशाभूल करणे हेच त्यांचे एकमेव काम आहे .कोणतीही उपपदार्थ निर्मिती नसताना आम्ही भोगावती अतिशय चांगला चालवला आहे .नरके यांची हिम्मत असेल तर समोरासमोरून बोलावे असे आव्हान दिले .
फोटोकॅप्शन
सांगरूळ येथे जाहीर प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर मधुरिमा राजे छत्रपती समोर उपस्थित जनसमुदाय