आरक्षण मर्यादा वाढ, जातवार जनगणना करणारच रोखून दाखवा, राहूल गांधींचे भाजपला आव्हान

Spread the news

आरक्षण मर्यादा वाढ, जातवार जनगणना करणारच

  1. रोखून दाखवा, राहूल गांधींचे भाजपला आव्हान¢7

 

कोल्हापूर

संविधान अधिक बळकट करण्यासाठी आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा असलेली भिंत पाडणार आणि जातवार जनगणना संसदेत मंजूर करून दाखविणारच अशी घोषणा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी कोल्हापुरात केली. आरएसएस, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे रोखून दाखवावेच असे आव्हानही त्यांनी दिले.

कोल्हापुरात संविधान सन्मान संमेलन घेण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या हजारावर प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत दिवसभर संविधान वाचविण्यासाठी काय काय करता येईल याचा उहापोह करण्यात आला. या परिषेदत बोलताना गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला बोल केला. इतिहास आणि घटना बदलण्याचे काम सध्या देशात सुरू असून हे रोखण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,खासदार शाहू महाराज, प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

गांधी म्ह्णाले, सध्या संविधान संकटात आहे. ते बदलण्याचे काम चोवीस तास सुरू आहे. हे रोखण्याबरोबरच ते अधिक बळकट करण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रथम आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली पाहिजे. शिक्षण, उद्योग यासह विविध क्षेत्रात काहींची मक्तेदारी दिसत आहे. ज्यांना गरज आहे, त्यांना आर्थिक मदत मिळत नाही. अभिमन्यूला सहा जणांनी चक्रव्युहात अडकवले होते, ती परिस्थिती आज आहे. आजही सहा जणांच्या चक्रव्युहात देश अडकला आहे. त्यातून बाहेर काढायचे आहे. दलित, ओबीसी, मागास लोकांच्या हातात सत्ता आणि धोरण बदलण्याची ताकद जोपर्यंत येत नाही, तो पर्यंत देश बदलणार नाही. नव्वद टक्के देशातील जनतेचे धोरण दहा टक्के लोक ठरवत आहेत, हे बंद व्हायला हवे.

गांधी म्हणाले, ते पुढे म्हणाले की, आज कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे ठोसपणे सांगता येत नाही. त्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. जातनिहाय जनगणना म्हणजे एक्सरे आहे, एक्सरे काढल्यानंतर समस्या काय आहे ते समजेल व नंतर त्यावर उपाय करता येईल पण जातनिहाय जनगणेला भाजपा, आरएसएसचा विरोध आहे. देशातील 90 टक्के जनतेला खरी माहिती कळू नये यासाठी ते विरोध करत आहेत.आरक्षण मर्यादा आणि जातवार जनगणना आम्ही मंजूर करणारच. आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो. याला कुणीही कितीही विरोध केला तरी आम्ही थांबणार नाही.  संविधान संपवू इच्छिणाऱ्यांना आमचे हे उघड आव्हान आहे. जे संविधानला विरोध करत होते, त्या पंतप्रधानांना संविधानाची प्रत कपाळाला लावावी लागली, हीच जनतेची ताकद असल्याचेही गांधी म्ह्णाले.

त्यापूर्वी खासदार राहुल गांधी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट दिली व त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

 

या कार्यक्रमाला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार शाहू महाराज, विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, रजनी पाटील, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, काझी निजामुद्दीन, बी.वी. व्यंकटेश, आ. भाई जगताप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, NSUI चे आमीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रतिभा शिंदे, सिव्हिल सोसायटीचे अशोक भारती, शाबीर अन्सारी, डॉ. अनिल जयहिंद, सुभाष यादव, विजयेंद्र पाल गौतम, पी. एस. पाटील आदी उपस्थित होते.

 

 

टेम्पो चालकाच्या घरात नाष्टा

 

संविधान संमेलनाला येण्यापूर्वी राहूल गांधी यांनी अचानक उचगाव येथे एका टेम्पो चालकाच्या घरी गेले. तेथे त्यांनी स्वयपाक घरात जावून वांग्याची भाजी केली. तेथे नाष्टा केला. अजित सनदे यांच्या घरी त्यांनी दिलेल्या अचानक भेटीने सारे उचगावकर भारावले. सामान्य जनतेशी नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी या कृतीने केला.

 

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!