राधानगरी मतदारसंघ देशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल : दाजीपूर अभयारण्य, किल्ले भुदरगड व किल्ले रांगणा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणार : कोल्हापुरातील मेळाव्या संस्कृत प्रतिसाद

Spread the news

राधानगरी मतदारसंघ देशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल
: दाजीपूर अभयारण्य, किल्ले भुदरगड व किल्ले रांगणा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणार
: कोल्हापुरातील मेळाव्या संस्कृत प्रतिसाद
गारगोटी:
देशातील पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल अशा पद्धतीने दाजी पुरचे अभयारण्य आणि ऐतिहासिक किल्ले भुदरगड व रांगणा किल्ला तसेच पावसाची चेरापुंजी समजले जाणारे किटवडे पर्यटन दृष्ट्या विकसीत करण्यासाठी मला विधानसभेत पुन्हा संधी द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार प्रकाश आबीटकर यांनी केले. ते राधानगरी मतदार संघातील कोल्हापूर वाशीय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते.
आ. आबीटकर म्हणाले, राधानगरी विधानसभा मदारसंघात गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामामुळेच आज खऱ्या अर्थाने मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. राधानगरी धरण परिसर व 84 गावांचे पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विकास प्राधिकरण मंजूर करण्यात आले असून या प्राधिकरणाच्या माध्यमातून धरण परिसरासह राधानगरी अभयारण्य पर्यटन विकासास चालना मिळणार आहे. काळामवाडी धरण रांगणा व भुदरगड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील असून या पुढील काळात दुर्ग पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देतील. त्यांना विविध सेवा सुविधा देणे तसेच रांगणा किल्ल्यावरून आकाशगंगा स्वच्छ दिसते असा परिसर या ठिकाणी असून भविष्यात विविध रोजगाराच्या संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. मतदार संघातील मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा गेल्या दहा वर्षांमध्ये प्रामाणिक प्रयत्न केला पुढील काळात देखील विविध विकासकामे मार्गी लावावयाचे आहेत यासाठी आपला आशीर्वाद मागण्यासाठी आज येथे आलो आहे. आपल्या मतदारसंघातील धनगर वाड्यामधील धनगर बांधव आणि फळे येथील मंडळी रोजगार वाडीच्या निमित्ताने आपला व्यवसाय करत आहेत. शासकीय नोकरीतील अधिकारी- कर्मचारी, वकील, नवोद्योजक, हॉटेलमधील काम करणारे सर्व मंडळींनी आपल्या श्रमाच्या बळावर कोल्हापुर येथे विश्व निर्माण केले आहे. या सर्वांमुळेच आज आपली जिल्ह्याचे ठिकाणी विशेष ओळख निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माहिती शासनाने पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली यामध्ये वाढ करत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुढील काळात एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कुटुंबातील श्रम करणाऱ्या माता-भगिनी त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे काम महायुती शासनाने केले असून पूर्वी महिलांना कर्त्या पुरुषांकडून पैसे मागावे लागत होते आता मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम केल्यामुळे त्या पुढील काळात आपल्या पतीदेवांना मदत करतील अशी परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केले. माजी आमदार के. पी
पाटील यांनी आपल्या दहा वर्षांच्या काळात काय केले हे जनतेला न सांगता बुद्धिभेद करण्याचे काम ते करत आहेत पण मी मात्र माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या विकास कामांच्या बळावर तुमच्याकडे आशीर्वाद मागत आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनता ही पैशाला भुलणारी नसून विकास काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे राहणारी स्वाभिमानी जनता आहे. त्यामुळेच आज मोठ्या संख्येने कोल्हापूर येथील मेळाव्यास आपली उपस्थिती पाहिल्यावर मला मी केलेल्या कामांची पोचपावती मिळाल्याचे समाधान आमदार आबिटकर यांन यावेळी बोलताना व्यक्त केले.
अभिजीत खतकर म्हणाले दहा वर्षा मागील राधानगरी भुदरगड आजरा मतदार संघ आणि दहा वर्षांनंतरचा मतदार संघ यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे प्रत्येक नागरिकखला याची जाण आहे.
संजय पाटील म्हणाले मी एनी सारख्या लहान खेड्यातून आलेला कार्यकर्ता असून आमच्या गावी जाण्यासाठी पूर्वी रस्त्यांची अवस्था बिकट होती एखादा मित्र किंवा पै-पावणे देखील येण्यास कचरायचे पण आमदार प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात या परिसरातील सर्व वाड्यावर त्यांचा विकास करत दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु के पी पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणतीही कामे न केल्यामुळेच अशा निष्क्रिय व्यक्तीस जनतेने ओळखावे.
यावेळी

……….
कोल्हापूर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद….

राधानगरी भुदरगड व आजरा तालुक्यातील कोल्हापूर वाशीयांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या मधून आपल्या कालावधीत केलेल्या कामाची पोचपावती या निमित्ताने मिळाल्याचे गौरवोद्गार आमदार प्रकाश आबीटकर यांनी काढले.
यावेळी विजय चौगुले, सुनील दळवी, अमरजा पाटील सचिन पाटील, विजय चौगुले यांची भाषणे झाली.
स्वागत सचिन परीट यांनी केले प्रास्ताविक सुनील दळवी यांनी केले. आभार भरत साबळे यांनी मानले. याप्रसंगी नंदकुमार ढेंगे, सुभाष चौगुले, शामराव खतकर, सतीश मुगडे, नारायण देसाई, एम. डी. चौगुले, शिवराज पाटील, ॲड. दिलीप देसाई,ॲड. दत्तात्रय राणे, प्रा धनाजी मोरोस्कर, सुरेश खैरे, प्रा. दौलतराव जाधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!