कदमवाडी, रुईकर कॉलनी परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार – राजेश लाटकर* *भीमनगर, कपूर वसाहतीत प्रचार सभेत आश्वासन*

Spread the news

*कदमवाडी, रुईकर कॉलनी परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार – राजेश लाटकर*

*भीमनगर, कपूर वसाहतीत प्रचार सभेत आश्वासन*

कोल्हापूर, ता. १७ – कदमवाडी ते रुईकर कॉलनी आणि परिसरातील ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले. भीमनगर, कपूर वसाहतीत झालेल्या सभेत ते बोलत होते. लाटकर पुढे म्हणाले, कदमवाडी, रुईकर कॉलनीसह आसपासच्या परिसरामध्ये ड्रेनेजची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिणामी प्रत्येक घरामध्ये सेप्टिक टँक आहेत. मात्र यामुळे आरोग्याची समस्या उभी राहते. निवडून आल्यानंतर पहिल्याच महिन्यात ड्रेनेजचा हा प्रश्न प्राधान्याने हाती घेऊन सोडविणार, त्याचबरोबर सांडपाण्याची निर्गत करण्यासाठी नियोजन करावे लागेल. थोडा जरी पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्यासाठी योग्य आकाराच्या गटारी, नदीच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे असे लाटकर म्हणाले. महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा मोठा उपयोग या ठिकाणी होईल. नगरसेवक, गटनेता ते स्थायी समिती सभापदी अशा पदांवर काम केल्याने कोणते काम कोणत्या विभागाकडे आहे, त्यासाठी कोणत्या विभागाकडे पाठपुरावा केला पाहिजे, याची जाण आहे त्या जोरावरच या प्रश्नाची सोडवणूक करणार आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज या पायाभूत सुविधा सोडविण्याची माझी जबाबदारी असेलच शिवाय येथील परिसराला प्रामुख्याने भेडसावणार प्रश्न आहे तो म्हणजे बी टेन्युअरचा. त्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी येथे येऊन या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे माझे प्रयत्न असतील.जनतेने प्रेशर कुकर चिन्हा पढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे लाटकर म्हणाले. ते म्हणाले, संविधानाने आपल्याला मत देण्याचा अधिकार दिला आहे. तो तुम्हालाही एक मत देण्याचा अधिकार आहे तसाच अडाणी-अंबानींनाही अधिकार आहे. आपले मत विचारपूर्वक द्या. ज्याप्रमाणे मी आमदार झाल्यास त्याची विशेष अशी नोंद लिहिली जाईल त्याप्रमाणे मी कोणाच्या मतावर उमेदवार झालो, त्याचीही नोंद घेतली जाईल. बंदूकीची एक गोळी जे काम करते त्याप्रमाणे मतदानाची जादू आहे. यासाठी आपले निर्णायक मत येत्या २० तारखेला माझ्या प्रेशर कुकर या चिन्हाला देऊन तुमचा मुलगा, भाऊ, दादा या नात्याने मला विधानसभेत पाठवा. यावेळी उपस्थित डॉ. अनिल माने म्हणाले, जातीयवादी विचारांच्या सत्तेला आपणाला हटवायचे आहे. आम्ही आपल्याकडे बुद्ध विहारची मागणी करीत आहोत. २०१९ मध्ये ज्याप्रमाणे २०१९ मध्ये करेक्ट कार्यक्रम केला, त्याच पोस्टर बॉयचा यावेळीही करेक्ट कार्यक्रम करून त्यांना कायमचे घरी बसवायचे आहे. त्यासाठी मी येथील जनतेच्या वतीने ग्वाही देतो की आपणाला १०० टक्के मतदान येथील जनता देईल. महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या कोल्हापूर उत्तरचा निकाल वीस तारखेला प्रेशर कुकरच्या बाजूनेच लागेल आणि आपला राजू विधानसभेत आमदार म्हणून भागाचे नेतृत्व करेल. यावेळी महेश जाधव, महावीर लाटकर, प्रकाश हुलेस्वार, सुरेश जत्राटकर व उदय फाळके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कपूर वसाहतीत आपचे शहर अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, निवडणुकी आधीच आपणाला येथील कार्यकर्त्यांनी लावलेला गुलाल सार्थक ठरणार आहे. स्वाभिमानी मतदार बंधू-भगिनीनो हीचा वेळ आहे आपल्या बहुमोल अशा मताचे मोल जाणण्याचा. त्यासाठी कितीही आमिषे आली तरी प्रामाणिक कार्यकर्त्याला निवडून देऊया. आजपर्यंत कधीही या भागात न आलेल्या विरोधी उमेदवारापेक्षा दररोज आपल्याशी संपर्क ठेवणारा राजेश लाटकर चांगला उमेदवार आहे. १५ वर्षे पद भोगलेल्या विरोधकांनी त्यांना मिळालेल्या एखाद्या कामातील टक्केवारी घेतली नसती तर शहरातील कित्येक अशी कामे उत्कृष्ट झाली असती आणि त्यांनी प्रचाराची वेळही आली नसती. जनतेने आपणहून त्यांना पुन्हा शहराचे नेतृत्व करण्याची संधी दिली असती. पण तुम्ही एक घटक सोडला नाही की ज्यामध्ये तुमचा व परिवाराचा विकासच तुम्हाला दिसतो आहे.
[11/17, 9:40 PM] Amardeep Patil: *डॉक्टर, अधिकाऱी, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरना धमकी देणारी प्रवृत्ती गाढून टाका – राजेश लाटकर*

*न्यू शाहूपुरीत महाविकस आघाडीची कोपरा सभा*

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात डॉक्टर, अधिकाऱी, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरना धमकी देणारी आणि सर्वसामान्य जनतेला मारहाण करणारी प्रवृत्ती गाढून टाका असे आवाहन महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी केले. न्यू शाहूपुरी येथे लाटकर यांच्यासाठी महाविकास आघाडीची कोपरा सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला दौलत देसाई, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, मंजित माने, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, हर्षल सुर्वे हे प्रमुख उपस्थित होते. लाटकर म्हणाले, खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्यातच यांची १५ वर्षे गेली. त्यातच गेल्या चार वर्षांपासून राज्यभर महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद या ठिकाणी लोकनियुक्त प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया राबविली गेली नाही. त्यामुळे प्रशासकाच्या नावाखाली यांनी राज्याच्या तिजोरीची लुटच लुट केली. या लुटीचा एक हिस्सा घेतलेले विरोधी उमेदवाराची भूक कधी भागतच नाही. त्यासाठी डॉक्टर, अधिकाऱी, कॉन्ट्रॅकटरना धमकी देणे, शेजारी, बिल्डरला मारहाण करण्यात यांनी धन्यता मानली. कोणी किती काम केले, याचा लेखाजोखा मांडायचा असेल तर त्यांना माझे तुमच्यासमोर आव्हान आहे. त्यांनी कधीही, कुठेही व्यासपीठावर चर्चेसाठी बोलवावे. जनताच ठरवू दे खरे काय आणि खोटे काय. हिंदुत्वच्या नावाखाली खोटा प्रचार करणाऱ्या विरोधी उमेदवाराने भगव्याचा अपमान केला व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली. ही गद्दार प्रवृत्ती गाडण्यासाठी जनतेने मला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रेशर कुकर आता घराघरात पोहोचले असून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विजयी करून कोल्हापूरकर इतिहास घडवतील असा विश्वास आहे असे लाटकर पुढे म्हणाले.
दौलत देसाई म्हणाले, माझ्यासह कित्येक दिग्गज आमदारकीचे तिकीट मागत होते. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. मात्र सतेज पाटील यांनी एका सामान्य उमेदवाराला उमेदवारी देऊन इतिहास घडवला आहे. लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करण्याचे जनतेचं ठरवले असून लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. माजी आमदार स्व. दिलीप देसाई यांच्यानंतर पुन्हा एकदा ई वॉर्डाचा आमदार होत आहे. यासाठी माझ्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. राजेश लाटकर यांच्या विजयासाठी परिसरातील नऊ मंडळे एकत्र आली आहेत. ह्या सर्वांची ताकद व सर्वसामान्य जनतेला आपला हक्काचा आपल्यातीलच व्यक्ती आमदार व्हावा असे वाटत असल्यामुळे लाटकर यांचा विजय निश्चित आहे असे दौलत देसाई यांनी सांगितले. संजय पवार म्हणाले, तुमची कामे करणारा, तुमचे अश्रू पुसणारा, तुमच्या समस्या सोडवणारा सुशिक्षित उमेदवार महाविकास आघाडीतर्फे उभा आहे. कोल्हापूर हे स्वाभिमानी शहर आहे. इथली माती वेगळी आहे. इथली जनता पैशाला भुलणार नाही. राजेश लाटकर यांना निवडून देऊन कोल्हापूरकरांनी इतिहास घडवावा. येत्या २० तारखेला गद्दाराला गाडायचे आणि तुमच्या परिसरातील एका प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करायचे तुमचे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी सर्वांनी आपली मतदानाची ताकद एकजुटीने लाटकर यांच्या मागे लावा आणि प्रभागातील समस्यांचा निपटारा करा. संदीप देसाई म्हणाले, उत्तरचे उत्तर प्रेशर कुकर हे मतदारांनीच ठरवले आहे. त्यामुळे तुमच्या-माझ्या मनातील, टक्केवारी न मागणारा, राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत काम केलेल्या राजेश लाटकर याना स्थानिक प्रश्नांची जाण आहे. कोणत्या योजनेसाठी कोणत्या योजनेतून निधी आणता येतो, याची जाण असणाऱ्या राजू लाटकर यांची लाट येत्या वीस तारखेला येऊ दे आणि तेवीस तारखेला विरोधक वाहून गेले पाहिजेत अशी ताकद त्यांच्या मागे लावूया असे देसाई म्हणाले. यावेळी उत्तम पाटील, भय्या शेटके, वासीम जमादार, यासीम जमादार, प्रमोद अतिग्रे, दिलीप शिर्के, संजय घाडगे, मीरासाहेब जमादार यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!