पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करावी
आमदार चंद्रदीप नरके यांची आग्रही मागणी
पुणे – बेंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर सहापदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे.त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.परिणामी पुणे ते कोल्हापूर प्रवासाला 6 तास लागत आहेत.याचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. काम सुरु असल्याने नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधा या मार्गावर उपलब्ध केल्या जात नाहीत, मग या मार्गावर टोल वसुली का केली जात आहे? असा सवाल केला.या मार्गावर टोल वसुली थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नरके यांनी केली.