शेती आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी महायुतीच्या अमल महाडिक यांना विजयी करा : प्रा. जालिंदर पाटील

Spread the news

शेती आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी महायुतीच्या अमल महाडिक यांना विजयी करा : प्रा. जालिंदर पाटील
कोल्हापूर :
शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आजवर काँग्रेसकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत. पण महायुती सरकारने राबवलेली शेतकरी सन्मान योजना, वीज बीलातील सवलत अशा योजना राबवून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. महायुती सरकारने या योजना राबवताना समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. शेतीशी संबंधित असणारे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आश्वासक अस कुणी असेल तर ते महायुतीच सरकार. आणि शेतीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने अमल महाडिक यांना विधानसभेत पाठवण ही आता आपली गरज असल्याचे मत, शेतकरी संघटनेचे प्रा. जालिंदर पाटील यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर दक्षिण चे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ नागाव गावात आयोजित करण्यात आलेल्या निर्धार सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, आज संपूर्ण राज्याचे लक्ष कोल्हापूर दक्षिण वर लागले आहे. संपूर्ण राज्याच्या व्यापक पटलावर ची ही हाय हॉल्टेज लढाई आहे. आयुष्य महाराष्ट्राची नजर या युद्धावर लागली आहे. आता तलवार बाहेर काढली आहे. ते आपलं विजय झाल्याशिवाय आता म्यान होणार नाही. हा बाणा घेऊन आपण सर्वांनीच अमल महाडिक यांना विजयी करायचं असल्याचे, त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, शेती क्षेत्राचा विचार करता खतांच्या किंमती, शेतीची मशागत, शेतमालाच्या किमती यावर महायुतीच सरकारच योग्य मार्ग काढू शकेल. सरकारची योजना थेट शेतकऱ्यांच्या दरात आणून शेतकऱ्यांना विश्वास देणारा आश्वासक चेहरा म्हणून अमल महाडिक यांच्याकडे आज शेतकरी पाहतो आहे. गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदारानी दक्षिण च्या दुरवस्थेचा जो चक्रव्यूह निर्माण करून ठेवला आहे, तो भेदण्यासाठी अमल महाडिक यांना बळ द्या, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले.
याप्रसंगी कृष्णराज महाडीक, शेतकरी संघटनेचे नेते प्रा. जालिंदर पाटील, ग्रीष्मा महाडिक, सुवर्णा महाडिक, रंगराव तोरस्कर सर, माजी सरपंच संगीता मगदूम, अण्णासो कोराणे, सात्ताप्पा पवार तानाजी राणगे, चेतना कांबळे, तुकाराम बोडके सर, पवन शेटे, बिपिन पाटील, भगवान कोराणे, किरण पोवार, चेतन पाटील, प्रमोद अतिग्रे, सुभाष कांबळे, विनायक सरदेसाई, सदाशिव मगदूम व महायुतीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते, तरुण मंडळे व युवक कार्यकर्ते, नागाव मधील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!