प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समितीतर्फे  शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी लेखक आपल्या भेटीला व शिक्षण परिषद 

Spread the news

 

प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समितीतर्फे

शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी लेखक आपल्या भेटीला व शिक्षण परिषद

कोल्हापूर

ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संपादक, अनुवादक, विविध संस्थांचे आधारवड प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समितीतर्फे शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी लेखक आपल्या भेटीला व शिक्षण परिषद या दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी.पी. माळी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 

प्राचार्य माळी यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांना लेखकांना भेटून त्यांचेशी सुसंवाद साधण्याचे आकर्षण असते. तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हातील खालील १० शाळांमध्ये लेखक आपल्या भेटीला हा सकाळी ८ ते १० या वेळेत उपक्रम आयोजित केला आहे.यामध्ये डॉ.जे. के. पवार डॉ. विश्वास सुतार, श्री. बाबुराव शिरसाट, श्री. उत्तम फराकटे,डॉ. रविंद्र ठाकूर, डॉ. दिनकर पाटील, डॉ. विनोद कांबळे,श्री. मिलिंद यादव, प्रा.टी.आर.गुरव, डॉ. बी.एम. हिर्डेकर यांचा समावेश आहे.

याच दिवशी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे नवीन शैक्षणिक धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा व शिक्षणाची वर्तमान स्थिती या विषयांवर शिक्षण परिषदेचे दुपारी १२ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन न्यू कॉलेज, कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील करणार असून पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे बीजभाषण करणार आहेत. या सत्रात प्राचार्य डॉ. जे.के. पवार, श्री. मिलिंद यादव व सौ. भाग्यश्री पाटील कासोटे यांना विविध पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहेत.

 

दुसऱ्या सत्रात इतिहास संशोधक व विचारवंत सदानंद कदम यांचे ‘वर्तमान शिक्षणातील लामणदिवे’ या विषयावर व्याख्यान होईल.  नंतर शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्राचार्य डॉ. बी.एम. हिर्डेकर यांचे ‘शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे बुद्धिमत्ता विकसन’ या विषयावर व्याख्यान होईल. या शिक्षण परिषदेत जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त शिक्षक सहभागी होणार आहेत.

 

 

तिसऱ्या सत्रात ५ शिक्षकांचे निबंध सादरीकरण होणार असून शेवटच्या सत्रोत प्राचार्य  प्रमुख पाहुणे म्ह्णून डॉ. प्रवीण चौगले यांचे मनोगत होईल. त्यानंतर प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले आणि डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे हस्ते प्रतिनिधिक प्रमाणपत्रे वितरीत केली जातील. नंतर डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या मार्गदर्शनानंतर परिषदेची सांगता होईल.

 

यावेळी समितीचे उपाध्यक्ष प्रा. टी.के. सरगर, सी.एम. गायकवाड, अमेय जोशी उपस्थित होते.

 

चौकट

 

यापूर्वीच्या कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद

प्राचार्य लवटे सर यांनी दि. ११ एप्रिल २०२४ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. आजवरच्या त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी बहुविध क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समितीच्या वतीने आजपर्यंत विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले. त्यानुसार रविवार दि. २३ जून २०२४ रोजी एमकेसील फौंडेशनचे चीफ मेंटर डॉ. विवेक सावंत यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितीजे व मानव’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, संपादक, प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे ‘चार्वाक ते पानसरे’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉल येथे संपन्न झालेल्या दोन्ही व्याख्यानांना श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!