Spread the news

*प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या टप्पा दोनच्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 38 हजार लाभार्थ्यांना लाभ*

*केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यक्रम*

भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची माहिती

कोल्हापूर दिनांक 21.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत महाराष्ट्रात एकूण 20 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली असून कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून ४१ हजार ६६१ इतक्या घरकुलांचे उदिष्ट असून ३८ हजार १५४ इतक्या घरकुलांना मंजुरी देण्यात आलेले आहे .
या सर्व घरकुलांना एकाच वेळी मंजुरी पत्र वाटप व यांना पहिल्या हप्त्याचे वितरणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे होणार असल्याची माहिती भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिली .
देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांचे शुभहस्ते व मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरच्या सह पालकमंत्री नामदार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलातून होणार असून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये व प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीमध्येव जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रम होणार आहे व प्रत्यक्ष या घरकुलांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात येणार येणार आहे .
कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून .प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील तालुक्यामध्ये त्या त्या विभागाचे आमदार व ग्रामपंचायत मध्ये त्या त्या गावातील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये घरकुलच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात येईल .
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या देशातला कोणताही घटक स्वतःच्या घरापासून वंचित राहू नये यासाठी प्रधानमंत्री आवास योजना अस्तित्वात आणली या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तब्बल वीस लाख घरकुलांना मंजुरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. महाराष्ट्र सरकारने या सर्व लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून या लाभार्थ्यांना लाभ मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्रातल्या वीस लाख कुटुंबाला तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या ३८ हजार १५४ इतक्या कुटुंबांना घरकुलाचे लाभ उपलब्ध होतील .
इथून मागच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर करून देण्याचे काम हे फक्त महायुतीच्या सरकारच्या काळातच झाली असून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी ,केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला तब्बल वीस लाख घरकुले व कोल्हापूर जिल्हाला तब्बल
३८ हजार १५४ इतकी विक्रमी घरकुले देणारे हे एकमेव सरकार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले .
जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला किमान 500 ते 1000 लाभार्थी पंचायत समितीच्या कार्यक्रमाला 300 ते 500 लाभार्थी आणि ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाला 50 ते 100 लाभार्थी यावेळी मंजुरी पत्र स्वीकारतील .
तरी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावातील घरकुल लाभार्थ्यांनी शनिवार दि २२ फेबुवारी रोजी दुपारी ३ वाजता आपापल्या गावातील ग्रा . प. मध्ये उपस्थीत राहून आपली मंजुरी पत्रे घ्यावीत असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे .

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!