खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे औचित्य त्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये फळे वाटप, रक्तदान शिबिर यांचा समावेश होता.
दरम्यान, महाडिक यांनी बुधवारी वाढदिनी तिरूपती बालाजीचे सहकुटुंब दर्शन घेतले.
15 जानेवारी हा खासदार महाडिक यांचा वाढदिवस. महाडिक यांना या निमित्ताने अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री यासह मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही शुभेच्छा दिल्या.
महाडिक हे गेली काही वर्षे वाढदिनादिवशी तिरूपतीला जातात. ते मंगळवारी पत्नी अरुंधती आणि तिन्हीं मुले आणि सुनांसह तिरूपतीला रवाना झाले होते. बुधवारी त्यांनी तेथे बालाजीचे दर्शन घेतले.
वाढदिवसानिमित्त करण यादव मित्रपरिवाराच्या वतीने ‘सीपीआर ‘मधील रुग्ण आणि नातेवाइकांना जेवण आणि फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी यादव यांच्यासह जयेश घरपणकर, निखिल खोपकर, पंकज कडवकर, किरण सूर्यवंशी, अभिजित पोवार उपस्थित होते.