कोल्हापूरकरांना जातीयवाद्यांना थोबाडीत मारण्याची संधी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन

Spread the news

कोल्हापूरकरांना जातीयवाद्यांना थोबाडीत मारण्याची संधी

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन

इंडिया आघाडी, महाविकास आघाडी वज्रमूठ सभा

कोल्हापूर

जातीयवाद, धर्मवादामुळे देशातील वातावरण कमालीचे गढूळ झाले आहे. कोल्हापूरने जातीयवादी विचारसरणीला कधीच थारा दिला नाही. राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतावादी विचार आणि लोकशाहीची बूज राखण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती लोकसभा निवडणूक लढवत आहेत. शाहू छत्रपती निवडून येतील यात शंका नाही पण ते प्रचंड मतांनी निवडून आले तर कोल्हापूरकरांना जातीयवाद्यांना थोबाडीत मारण्याची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ वज्रमूठ सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, पी.एन. पाटील, राजूबाबा आवळे, जयंत आसगांवकर, जयश्री जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार सुरेश साळोखे, संजयबाबा घाटगे, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, देशात गरीब श्रीमंतांच्या दरी वाढत आहे. देशात एकच चांगला पक्ष आहे असा आभास निर्माण केला जात आहे. अशावेळी कोल्हापूरातून इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने शाहू छत्रपतींनी निवडणूक लढवावी म्हणून विनंती केली होती. शाहू महाराजांनी विनंती मान्य करत काँग्रेस पक्षाची उमेदवारी स्वीकारली हा काँग्रेसचा बहुमान आहे. ही निवडणूक देशाला दिशादर्शक ठरणारी आहे. इंडिया आघाडी जिंकल्यावर देशातील सामान्य गरीब, युवक, भगिणी, वृद्ध यांना आपला विचार व्हायला लागला आहे असे वाटू लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजा असूनही नम्रपणे वागणारे ,अभ्यासू, सर्वसामान्यांना मान देणारे व्यक्तीमत्व असलेल्या शाहू छत्रपतींना लोकसभा निवडून पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील म्हणाले, देशातील वातावरण गढूळ असताना विचारांची लढाई लढण्यासाठी पुढे येऊन नेतृत्व करण्याची भूमिका शाहू महाराजांनी स्वीकारली आहे. देश आणि राज्यातील घाणेरड्या राजकारणाची परिस्थिती बदलायची असेल तर शाहू महाराजांना निवडून आणण्याची कोल्हापूरकराची जबाबदारी आहे. कोल्हापूरची अस्मिता, स्वाभिमान आणि अभिमान याची लढाई असून त्यांच्या विजयाने कोल्हापूरच्या विकासाची गती वेगाने वाढणार असल्याचा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. शाहू महाराज निवडून आल्यावर प्रत्येक तालुक्यात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालय उघडले जाईल अशी ग्वाहीही सतेज पाटील यांनी दिली.

श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अदिलशाही, मुघलांशी लढाई करुन स्वराज्य स्थापन केले. छत्रपती, संभाजीराजे, महाराणी ताराराणी यांनी मुघलांशी लढा देउन स्वराज्य वाचवले. मधल्या काही काळात समाज विस्कळीत झाला होता. पण महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांनी समतावादी विचाराची पेरणी करुन समाज पुन्हा एकत्र केला. या थोर पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेउन काम करायचे आहे. सध्या देशात एकाधिरशाही रुपांतर हुकुमशाहीत होण्याची भिती आहे. एकाधिरशाही घालवून लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे ते म्हणाले, २८ पक्षाची इंडिया आघाडी देशात परिवर्तन घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार पी.एन. पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर श्रध्दा ठेवणाऱ्या शाहू छत्रपतींनी भूमिहिन शेतकऱ्यांना आरे गावात जमीन दिली. चिखली आंबेवाडीतील पुरग्रस्तांना स्वत ची जमिन देउन १४०० प्लॉट दिले. सर्वांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात. अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या शाहू महाराजांना लोकसभेत बहुमताने निवडून द्या ,असे आवाहन त्यांनी केले.

माजी खासदास संभाजीराजे म्हणाले,. ही निवडणूक पक्षाच्या पलीकडे गेली असून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर श्रध्दा ठेवण्याऱ्या शाहू छत्रपतींना इंडिया आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षासह विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केला आहे.

शिवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, विश्वासघातकी आणि गद्दारांना जनता खपवून घेत नाही हे कोल्हापूरची जनता निवडणुकीत दाखवून देईल.
राजा नाही हा संत आहे हा गद्दारांचा अंत आहे असा इशारा नंदाताई बाबुळकर यांनी विरोधकांना दिला. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भरत पाटणकर, कॉम्रेड दिलीप पोवार जनता दलाच्या स्वाती कोरी, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, संचालक अमरीशसिंह घाटगे, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष भरत पाटील, सूर्यकांत बुद्धिहाळकर, अप्पी पाटील, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनिल मोदी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,
शेकापचे बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, बाबासो देवकर, कॉ. चंद्रकांत यादव, सतिशचंद्र कांबळे
.कॉ बी एल बरगे, रघुनाथ कांबळे ,सुभाष जाधव, शिवाजीराव परुळेकर ,अतुल दिघे, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे, संतोष सूळकुडे, संजय गुदगे, विलास कांबळे ,डी. जी. भास्कर,अनिल चव्हाण, हसन देसाई, प्रा टी एल पाटील, प्रा टी एस पाटील, सरलाताई पाटील,भारती पोवार
शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, प्रतिज्ञा उत्तुरे, शिवानंद माळी, मुकुंद देसाई, भरत लाटकर, राजेश पाटील, केरबा चौगुले, राजू लाटकर आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!