*श्रेय लाटण्यात विद्यमान आमदार ऋतुराज पाटील मातब्बर : सौ. शौमिका महाडिक*
कोल्हापूर – विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात आपण केलेली विकासकामे बघण्यासाठी मोठमोठ्या बॅनरवर स्कॅन कोड लावले आहेत. सांगवडे वाडी येथील एका तरुणाने स्कॅन केले असता, तिथे पाचगाव, गगनबावडा भागातील कामे दिसली. असेच स्कॅम कोड सगळीकडे लावण्यात आले आहे. जे आपण केलेले नाही त्याचेही श्रेय ऋतुराज पाटील घेत आहेत. याबाबतीत ते अगदी मातब्बर आहेत. असा आरोप गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी केला.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ नेर्ली येथे आयोजित निर्धार सभेत त्या बोलत होत्या. “नेर्लीतील जनतेसाठी आमदार नसताना देखील अमल यांनी विकासात्मक कामे केली. ऋतुराज पाटील मात्र कोरोनाच्या पडद्याआड मतदारसंघात दुर्लक्ष करत राहिले. निवडणूक जवळ आल्यावर ते केवळ बॅनर लावण्यातच सक्रिय झाले आहेत. पण नेर्लीची जनता सुज्ञ आहे. त्यांची ही लबाडी जनतेने ओळखली आहे.” असे त्या म्हणाल्या.
“२०१० साली तत्कालीन गृहराज्यमंत्री यांनी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर एमआयडीसीचे शिक्के मारले होते. गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा त्यांचा हा प्रयत्न विराजसिंह निंबाळकर यांनी हाणून पाडला. पुढे २०१४ साली आमदार झाल्यावर अमल महाडिक यांनी हे शिक्के उठवून शेतकऱ्यांच्या सुमारे ६०० एकर जमिनी त्यांना परत केल्या. तत्कालीन गृह राज्यमंत्री यांच्या अन्यायाला बळी पडलेली अशी अनेक उदाहरणे आहेत. असे त्या म्हणाल्या.
“सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांना व कामांना हे सातत्याने विरोध करत असतात. महिलांना बस तिकिटामध्ये ५०% आरक्षण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांना त्यांनी केलेला विरोध लपून राहिलेला नाही. अगदी राम मंदिर बांधण्यास देखील यांनी विरोध केला.” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
महाडिक यांचे मामा विराजसिंह निंबाळकर यांच्या आठवणीत त्या सभेत बोलताना भावूक झाल्या. येथील शेतकऱ्यांसाठी त्यांनी उभ्या केलेल्या पाणीपुरवठा संस्थेचा उल्लेख करत त्यांनी निंबाळकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना सदाशिव चौगुले यांनी महायुती सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती दिली. यामध्ये विशेषतः विश्वकर्मा समाजासाठी राबवण्यात येत असलेल्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा उल्लेख त्यांनी केला. शिवाय भाजपा सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले मात्र महाविकास आघाडीला ते न्यायालयात टिकवता आले नाही. हे त्यांचे अपयश आहे. असे ते यावेळी म्हणाले.
सभेला माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा वासकर, सरपंच अंकुश पुजारी, मधुवंती निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य वसुंधरा चौगुले, सुमित्रा सुतार, वैशाली सुतार, प्रवीण गवळी, दीपक मगदूम, जितेंद्र संकपाळ, मकरंद चौगुले, बजरंग चौगुले, नितीन संकपाळ, धनाजी नलवडे, अशोक सिद्धनेर्ले यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट*
*विरोधक ही अमल महाडिक यांचा सन्मान करतात*
अमल महाडिक हे एकमेव नेते आहेत ज्यांचा विरोधक देखील सन्मान करतात. त्यांच्या चारित्र्यावर आजपर्यंत एकही डाग लागलेला नाही. त्यांना केवळ समाजकारण कळते. म्हणूनच आज जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. हीच आमची संपत्ती आहे. असे महाडिक यावेळी म्हणाल्या.