*समरजितसिंह घाटगे यांच्या विजयासाठी
लाल बावटा बांधकाम संघटनेचे कामगार आघाडीवर असतील-प्रकाश कुंभार*
*लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचा घाटगे यांना जाहीर पाठिंबा*
उत्तूर,प्रतिनिधी.
कागल विधानसभा मतदारसंघातील लाल बावटा बांधकाम संघटनेचे कामगार समरजितसिंह घाटगे यांच्या विजयासाठी आघाडीवर असतील.अशी ग्वाही लाल बावटा बांधकाम संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कुंभार यांनी दिली.
येथील धुरे हाॕल येथे कागल गडहिंग्लज उत्तूर विभागातील लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या कामगार व कार्यकर्त्यांच्या कागल विधानसभा मतदारसंघातून समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर करण्यासाठी झालेल्या मेळाव्या वेळी ते बोलत होते.
यावेळी संघटनेच्या कामगार व कार्यकर्ते यांनी समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा दर्शवित त्यांना शुभेच्छा दिल्या.
कुंभार पुढे म्हणाले, कोणतेही संविधानिक पद नसताना समरजितसिंह घाटगे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांच्या दारात जाऊन दिला आहे. पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त कारभार व शाश्वत विकासाचे व्हिजन असलेल्या सीए सारखे उच्चशिक्षित घाटगे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाची कागल विधानसभा मतदारसंघाला आवश्यकता आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले,शासनाच्या योजना व लाभार्थी यांच्यातील दुवा म्हणून लोकप्रतिनिधींनी काम करावयाचे असते.परंतु अलीकडच्या काळात खिशातील पैसे दिल्यासारखे लाभार्थ्यांवर उपकाराचे वातावरण केले आहे.ही उपकाराची भाषा कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातून बंद झाली पाहिजे.शासकिय योजनांच्या लाभासाठी नागरिकांनी नेत्यांकडे भल्या पहाटे येरझा-या मारण्याऐवजी आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या दारात शासनाच्या योजनांचे लाभ घेऊन जात आहोत. बांधकाम कामगारांना मेडिकल, घरकूरल, पेन्शन व त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीसह इतर योजनांचे लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या पाठिंब्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मोठी ताकद मिळाली आहे.
कार्यक्रमास अजित मगदूम,अशोक चोथे, दयानंद चव्हाण, दिनकर सुतार, सुनील पाटील, मारुती जाधव आनंदा देवार्डे, रमेश कांबळे, युवराज जाधव, बाबुराव भिउंगडे, उषा कांबळे ,रेश्मा सावंत ,दत्तात्रय देसाई ,धनश्री चव्हाण ,राजू गणाचारी आदी उपस्थित होते.
संजय चौगुले यांनी स्वागत केले. रामचंद्र नाईक यांनी आभार मानले.
छायाचित्र उत्तूर येथे लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करुन जाहीर पाठिंबा व्यक्त करताना बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
छत्रपती शाहू महाराजांच्या ऋणातून उतराईची संधी
आरक्षणाचे जनक राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे बहुजन समाजावर अनंत उपकार आहेत.त्यांच्या जनक घराण्याचे वंशज असलेल्या समरजितसिंह घाटगे यांना मतदान करून शाहू महाराजांच्या या ऋणातून उतराई होण्याची संधी या निमित्ताने बहुजन समाजाला मिळाली आहे. त्यांना आमदार करण्यासाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी जीवाचे रान करतील. अशी ग्वाही कुंभार यांनी यावेळी दिली.