विरोधी उमेदवाराचे सारे आयुष्य लबाड बोलण्यातच खर्च
प्रकाश आबिटकर यांचा टोला
राधानगरी
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने *राधानगरी* तालुक्यातील *कसबा वाळवे जिल्हा परिषद* मतदार संघातील *अर्जुनवाडा, जोगेवाडी, कपिलेश्वर, कासारवाडा, तळाशी* आदी गावांचा दौरा केला. यावेळी उपस्थित नागरीक, कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.
राधानगरी मतदार संघातील गावागावात विकास पोहोचविण्याचं काम केलं आहे. त्यामुळे जनतेत समाधानाचे वातावरण आहे. मतदार संघातील ८० हजार महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे महिला वर्गातही उत्साहपूर्ण वातावरण आहे.
गेल्या दहा वर्षात झालेला विकास पाहून विरोधकांचे डोळे विस्फारून गेले आहेत. के.पी.पाटील यांनी त्यांच्या कालावधीत केलेल्या 10 वर्षाच्या कामाचा हिशेब आम्ही मागत असताना त्याचे उत्तर द्यायचे सोडून ते बेताल आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपले सर्वच आयुष्य लबाड बोलण्यात खर्च घातले आहे. त्यांच्या लबाडीचा दणका अनेकांना बसला आहे त्यामुळे जनतेला त्यांच्या लबाडीची चांगलीच माहिती आहे. निवडणुकीत जनताच त्यांचा पोलोखोल करेल असा विश्वास केला.
*आमदार प्रकाश आबिटकर*
*राधानगरी विधानसभा मतदार संघ*