आमदार कोणाला करायचं हे जनताच ठरविते: आमदार. आबिटकर बिद्रीच्या आडून के पिंचे राजकारण.

Spread the news

आमदार कोणाला करायचं हे जनताच ठरविते: आमदार. आबिटकर
बिद्रीच्या आडून के पिंचे राजकारण.
गारगोटी प्रतिनिधी:राजेंद्र यादव
भुदरगड तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याsसाठी सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसुन कामा वीला लागावे असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी इंजुबाई हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत केले.

गेल्या 10 वर्षात मतदार संघातील रस्ते, सिंचन, आरोग्य याविषयावर प्रचंड काम केले असून यामुळे मतदार संघचा चेहरा-मोहरा बदलेलेा आहे. येत्या १ ऑगस्ट पासून मतदार संघात विकास यात्रा सुरू करणार आहे. तसेच राज्यस्तरावरील विविध प्रश्नांची सोडवणूक केली आहे.

पुढे बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की,अवघ्या 2 वर्षात पाच पक्ष बदलनाऱ्या माजी आमदारांनी आमच्या निष्ठेवर बोलणे बंद करावे. स्वर्गीय माजी आमदार हरिभाऊ कडव, हिंदुराव पाटील यांच्या पासून ते माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या पर्यंत सर्वांशी गद्दारी करून सत्तेत आलेल्यानी आमच्यावर बोलू नये. आम्ही खोक्यांसाठी नाही तर मतदार संघासह मतदार संघातील सर्वसामान्य नागरीकांचा विकासाचा अजेंडा घेऊन गेलो आहे. त्यामुळे दुर्गम आणि डोंगराळ असलेल्या मतदार संघात विकास कामांचा डोंगर उभा केल्याने मतदारसंघ आपली जुनी ओळख पुसून नव्याने विकसित झाला असल्याचे सांगितले.

यावेळी कोकण केसरी के.जी.नांदेकर, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, कृषी विद्यापीठाचे शासकीय प्रतिनिधी दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, सूर्याजी देसाई, प्रा.दौलतराव जाधव, बी.डी.भोपळे, मदनदादा देसाई, संदीप वरंडेकर, बाबा नांदेकर, अशोकराव भादीगरे, माजी सभापती अजित देसाई, सुनिल निंबाळकर, संजय गांधी समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील, सर्जेराव देसाई (तात्या), अंकुश चव्हाण (बापू), शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत, मानसिंग पाटील, बी.एस.खापरे, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट यांच्यासह प्रमुख मान्यवर व प्रमुख कार्यक्रर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!