प्रदूषण मुक्तीसाठी देशी झाडांची लागवड अत्यावश्यक
प्रतिनिधी :
कोल्हापूर प्रदूषण मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशी वृक्ष लागवड करून ती जगविणे हि काळाची गरज आहे. देशी झाडे लावून हा परिसर निसर्गरम्य बनविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जेष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ मधुकर बाचूळकर यांनी केले.
ते स्मँक भवन येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टच्या “कोल्हापूरचा पारा @41अंश ते पुन्हा @36 अंश करणे” या पर्यावरण चळवळ उपक्रमातंर्गत आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक होते. स्मँकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, भारत जाधव, अजय रानगे, राहूल मगदूम, यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ .बाचूळकर पुढे म्हणाले, शिरोली एमआयडीसी परिसरात जिथे झाडे लावण्यास वाव असेल तेथे देशी झाडे लावली गेली पाहिजेत. त्याचबरोबर त्याची नोंद ठेवणे भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
माणसाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यासाठी वृक्ष लागवड गरजेची असून अनावश्यक वृक्ष तोडीस विरोध केला पाहिजे. जगात दुर्मिळ असणारी पश्चिम घाटाची जैव विविधता टिकवणे आपली जबाबदारी आहे. विकास करताना निसर्गाचा विचार करून समतोल राखणे गरजेचे आहे.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक म्हणाले,आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पर्यावरण चळवळ सुरु केली आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी परिसरात आठशे ते अकराशे देशी झाडे लावून पर्यावरण पूरक सुंदर अशी कोल्हापूरची एमआयडीसी बनविण्यात येईल. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही केले.
स्मँकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. स्मँक, शिरोली एमआयडीसी, विभागीय कार्यालय आणि आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट एकत्रित शिरोली एमआयडीसी मध्ये आदर्श वृक्ष लागवड करून हे सर्व वृक्ष जगविण्यात येतील याची आम्ही काळजी घेऊ.
आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहूल मगदूम यांनी बैठकीच्या सुरवातीला
“कोल्हापूरचा पारा @41अंश ते पुन्हा @36 अंश करणे” या चळवळीच्या माध्यमातून तापमान कमी करण्या संदर्भात विविध माध्यमातून एप्रिल महिन्यापासून सुरु केलेल्या पर्यावरण चळवळ संदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसीच्या संपूर्ण परिसरात लावण्यात येणाऱ्या झाडांची माहिती देवून येत्या दहा वर्षात एमआयडीसी परिसरातील बदल पाहायला लोक येतील अशी आशा व्यक्त केली.
बैठकीस स्मँक संचालक राजू पाटील, भरत जाधव, बदाम पाटील,सहाय्यक अभियंता अजय रानगे ,
शिवाजी विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक अभिजित जाधव
, किशन गिरी, आदी उपस्थित होते.
फोटो….
शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मँक भवन येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टच्या
“कोल्हापूरचा पारा @41अंश ते पुन्हा @36 अंश करणे” या पर्यावरण चळवळ निमित्ताने आयोजित बैठकीच्या वेळी जेष्ठ वनस्पती शात्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांचे स्वागत करताना स्मँकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, भरत जाधव, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, अजय रानगे, राहूल मगदूम, बदाम पाटील आदी मान्यवर.