पी.डी.धुंदरे सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व … – अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ

Spread the news

कोल्‍हापूर ता.२७: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने संघाचे माजी संचालक श्री.पी.डी.धुंदरे यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा गोकुळच्या वतीने शाल फेटा व महालक्ष्मीची मूर्ती देऊन सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि, संघाचे माजी संचालक पी.डी.धुंदरे संघात २००७ ते २०२१ असे १४ वर्ष संचालक म्हणून व भोगावती सहकारी साखर कारखाना येथे १९८९ ते २००० कारखान्याचे संचालक व व्हा चेअरमन पद भूषवले आहे तसेच गावामध्ये विविध सहकारी संस्थेची स्थापना करून उत्तम व्यवस्थापनाद्वारे चालवल्या असून पी.डी.धुंदरे हे सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना दूध उत्पादक व शेतकरी ,गोकुळच्या प्रगतीसाठी त्यांनी बहुमोल योगदान दिलेले आहे. असे मनोगत केले व गोकुळ परिवारामार्फत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्कारास उत्तर देताना पी.डी.धुंदरे म्हणाले कि गोकुळमध्ये काम करत असताना जुन्या आणि अनुभवी संचालकांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन आणि अनुभव घेता आला. गोकुळमध्ये खूप काही शिकता आले आणि दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी काही योगदान देता आले याचा मला आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. गोकुळने दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून काम केले असून गोकुळने नेहमीच गुणवत्ता जपली आहे. खासकरून दुग्धव्यवसाय किफायतशीर होण्यासाठी गोकुळचे उत्तम दर्जाचे महालक्ष्मी पशुखाद्य निर्मिती केली आहे म्हणून खाजगी दूध संघांच्या पशुखाद्यचे दर नियंत्रणात आहेत तरी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी गोकुळचे पशुखाद्य वापरावे असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
—————————————————————————————————
फोटो ओळ – सत्‍कारप्रसंगी चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले,आदी दिसत आहेत.
——————————————————————————————————

  1. U­

 



Spread the news

You may also like

error: Content is protected !!