२२ मार्च २०२५ रोजी, भारतातील मोटारस्पोर्ट्ससाठी प्रशासकीय संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ मोटर
- स्पोर्ट्स क्लब्स ऑफ इंडिया (FMSCI) ने चेन्नई येथे त्यांचा वार्षिक पुरस्कार सोहळा होणार आहे. या समारंभात कोल्हापूर येथील पल्लवी शामराव यादव यांना “नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियन २०२४” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ फायनल्स, ही ४-व्हीलर टाइम अटॅक कार रेस ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी चेन्नई येथील मद्रास इंटरनॅशनल सर्किट (MIC) येथे आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब्स ऑफ इंडिया (FMSCI) च्या नेतृत्वाखाली आणि मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लब (MMSC) द्वारे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये पल्लवी यादव हीने महिला ओपन श्रेणीमध्ये चॅम्पियनशिप मिळवून कोल्हापूरचे नाव भारतामध्ये झळकवले आहे.
पात्रता फेरी १९ जानेवारी २०२५ रोजी झाली आणि अंतिम फेरी १२ जानेवारी २०२५ रोजी झाली. मुंबई, गोवा, दिल्ली, कोलकाता आणि चिकमंगळूरसह विविध ठिकाणांहून ड्रायव्हर्स आणि रेसिंग संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. या चॅम्पियनशिपमध्ये मॉडिफाइड आणि स्टॉक श्रेणीमध्ये विविध वर्गाचा समावेश होता.
• कोल्हापूरच्या पल्लवी शामराव यादव हीने पुढील पुरस्कार मिळवले.
1. महिला ओपन श्रेणीमध्ये पहिले स्थान,
2. महिला श्रेणीमध्ये “नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियन २०२४”
3. स्टॉक श्रेणीमध्ये १४०० सीसी-१६५० सीसी मिश्र श्रेणीमध्ये तिसरे स्थान.
पल्लवीला खालील संस्थाकडून प्रोत्साहन लाभले.
1. श्री. वामसी मेर्ला (व्हीएम स्पोर्ट्स फाउंडेशन, चेन्नई, प्रायोजक)
2. श्री. अनिश नाथ (ए अॅड ए मोटरस्पोर्ट्स, बेंगळुरू, रेसिंग कोच आणि नॅशनल रॅली रेसर)
3. स्प्रिंट मोटरस्पोर्ट्स (रेस कार ट्यूनर टीम, कोइम्बतूर)