*पालकमंत्री हसन मुश्रीफ सहभागी झाले पंढरीच्या दिंडीत*
*वेळापूरमध्ये घेतले पालखीचे दर्शन*
*महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसह चांगल्या पाऊस मानाची केली प्रार्थना
*वेळापूर, दि. १४:*
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ पंढरपूरच्या मार्गावरील पायी दिंडीत दाखल झाले. वेळापूर ता. माळशिरस येथे दिंडीमध्ये सहभागी होत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मनोभावे पालखीचे दर्शन घेतले.
विठुराया चरणी महाराष्ट्रातील जनतेला सुखी- समृद्ध व ठेवण्याची व पाऊसमान चांगले राखण्याची प्रार्थना केली.
डोक्यावर पांढरी, टोपी गळ्यामध्ये शेला आणि खांद्यावर भगवी पताका घेऊन हरिनामाच्या गजरात मंत्री श्री. मुश्रीफ तल्लीन झाले.
मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या समवेत गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, बिद्रीचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणीचे अध्यक्ष उमेश भोईटे, माजी उपनगराध्यक्ष नवल बोते, नीतीन दिंडे, सौरभ पाटील, सतीश घाडगे, सागर गुरव, प्रवीण सोनुले, दिग्विजय डुबल आदी प्रमुखांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले.
=============