ओसांडणारी गर्दी, शुभेच्छांच्या सरी अन् महाधुरळाचा दिमाखदार वर्धापनदिन सोहळा

Spread the news

ओसांडणारी गर्दी, शुभेच्छांच्या सरी अन् महाधुरळाचा दिमाखदार वर्धापनदिन सोहळा

 

 

कोल्हापूर : वाचकांची ओसांडणारी गर्दी, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सदिच्छा आणि शुभेछांच्या सरीवर सरी हे सुखद चित्र
होते, पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या महाधुरळा यू टयूब चॅनेलच्या पहिल्या वर्धापनदिनाचे. शनिवारी, बारा एप्रिल २०२५ रोजी नागाळा पार्क
येथील बालाजी गार्डन येथे हा स्नेहमेळावा आयोजित केला होता. या दिमाखदार सोहळयाचे असंख्य जण साक्षीदार बनले.
सायंकाळी पाच वाजता स्नेहमेळाव्याला प्रारंभ झाला. केक कापून वर्धापनदिनाचा गोडवा वाढला. याप्रसंगी राजकारण, समाजकारण, सहकार,
शैक्षणिक, उद्योग, कृषी, सांस्कृतिक व प्रसारमाध्यम क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवित वर्धापनदिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. काँग्रेसच्या
ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील, लिंगायत समाजाचे बाबुराव तारळी, राजशेखर तंबाखे, प्राचार्य मधुकर बाचूळकर, क्रिकेट संघटनेचे बाळ
पाटणकर, केदार गयावळ, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक, महापालिका कर्मचारी संघाचे
संजय भोसले, महापालिका अधिकारी हर्षजीत घाटगे, सुरेश पाटील, नारायण भोसले, उद्योजक देवेंद्र दिवाण, प्रसाद कामत, आर्किटेक्ट
असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, लिंगायत समाजाचे सुनील गाताडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे
अध्यक्ष शिरीष कणेरकर, उपाध्यक्ष जयसिंग माने, संचालक राजन भोसले, मधुसूदन सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे माजी
सदस्य बाबासाहेब देवकर, महेश चव्हाण, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, माजी नगरसेवक महेश बराले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा
जांभळे, सुनील देसाई, कॉम्रेड दिलीप पवार, सतीश कांबळे, शाहू काटकर, शिवसेनेचे किशोर घाटगे, अंकुश निपाणीकर, दुर्गेश लिंग्रस,
शिवसेना ठाकरे गटाचे विशाल देवकुळे, अनिल खवरे, सुरेश यादव, शिवाजीराव पवार पाटील, सलीम मुल्ला यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सराफ व्यावसायिक बाबा महाडिक, माधुरी बेकरीचे वडगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.
सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, महावितरणमधील निवृत्त अधिकारी सर्जेराव विभुते,
इंजिनीअर रमेश पोवार, प्रा. डॉ. डी. ए. देसाई, प्रा. के. के. सरगर, प्रा. शशिकांत चौधरी, प्रा. टी. के. सरगर, प्रा. अनिल घस्ते,
प्रा. डॉ. शिवाजी जाधव, प्रा. जयसिंग सावंत, प्रा. दिग्विजय पवार, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर,
माहिती अधिकारी वृषाली पाटील उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे डॉ. प्रविण कोडोलीकर, अॅड
मंदार पाटील, अभिजीत राऊत, अजिंक्य शिंदे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, अनिल चौगुले, अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी
शुभेच्छा दिल्या. शिक्षक संघटनेचे बाबा पाटील, के. के. पाटील, उदय पाटील, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सुर्यकांत चव्हाण, सी. एम.
गायकवाड, कोजिमाशिचे माजी चेअरमन मदन निकम, बी. के. मडिवाळ, व्ही. एस. पाटील, एस. बी. लांडगे, राजेंद्र कोरे, दिलीप
माने, संजय कळके, विजय एकशिंगे, प्राचार्य अजेय दळवी, प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, उदय कुंभार, डॉ. वसीम मुल्ला, शिक्षक
आप्पासाहेब वागरे, संजय महादेव पाटील, सर्जेराव नाईक, किरण खटावकर, मच्छिंद्र नाळे, कृष्णा चौगुले, चारुलता पाटील, रोहिणी
येडगे, छाया हिरुगडे, साताप्पा कासार, अमित परीट, कुमार पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. गोकुळमधील अधिकारी संग्राम मगदूम, न्यू
करवीर अॅटो रिक्षाचे राजेंद्र थोरावडे, सुभाष सुर्वे, राज कारंडे, सारस्वत बोर्डिंगचे माजी विद्यार्थी सुभाष पाटील, विजय पाटील उपस्थित
होते.
कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस असोसिएशनचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ती, संघटक रघुनाथ कांबळे, कार्याध्यक्ष परशराम
सावंत, खजानिस सुरेश ब्रह्मपुरे, संचालक सतीश दिवटे, अंकुश परब, सुनील समडोळीकर यांनी पत्रकार माळी यांचा सत्कार केला. चेंबर
ऑफ कॉमर्सचे राहुल नष्टे, अनिल धडाम, अनंत सांगावकर, गूळ व्यापारी निमेश वेद, डॉ. राजेंद्र भस्मे, विश्वनाथ चव्हाण, अॅड.
चारुशिला चव्हाण, राजेंद्र चव्हाण यांनी महाधुरळाच्या वर्धापनदिनाला शुभेच्छा दिल्या.
प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींच्या शुभेच्छा…
प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी उपस्थित दर्शवित शुभेच्छा व्यक्त केल्या. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, विजय चोरमारे, निखिल पंडितराव,
कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी शुभेच्छा दिल्या. लोकमतमधील वरिष्ठ अधिकारी मकरंद देशमुख, संतोष साखरे, वरिष्ठ
पत्रकार विश्वास पाटील, सकाळमधील वरिष्ठ अधिकारी यतीश शहा, अतुल एकशिंगे यांनी सदिच्छा व्यक्त केल्या. पत्रकार सरदार करले,
विकास कांबळे, दयानंद लिपारे, समीर देशपांडे, सतीश घाटगे, संतोष पाटील, विद्याधर पिंपळे, बाळासाहेब उबाळे, सचिन यादव,
भीमगोंडा देसाई, पोपट पवार, डी. बी चव्हाण, समीर मुजावर, विजय पोवार, सुरेश आंबूसकर, वृत्त वाहिन्याचे पत्रकार विजय केसरकर,
प्रमोद व्हनगुत्ते, शिवाजी शिंगे आदी उपस्थित होते. शरद कोतेकर, युवराज कवाळे उपस्थित होते.
……………….
वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे सत्कार, गुणवतांचा गौरव
माळी समाज संघटनेचे अण्णासाहेब माळी, अनिल माळी, बाळासाहेब माळी, चंद्रकांत माळी, किशोर माळी, तानाजी माळी, काशीनाथ
माळी, राजू माळी, अशोक माळी, सुनील माळी, राजाराम माळी, सांगली येथील राम माळी, लिंगायत माळी समाज महिला मंडळाच्या
अध्यक्षा वंदना माळी, उपाध्यक्षा वैशाली माळी, सचिव श्रृती कुलगुडे, रुपाली माळी, ऋतुजा माळी यांनी शुभेच्छा दिल्याशिक्षक संदीप मगदूम
यांच्या खुशखुशीत निवेदनाने कार्यक्रम रंगतदार झाला. वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे पत्रकार माळी यांचा सत्कार झाला. याप्रंसगी शालेय
स्तरावरील स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या महावीर इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी स्वरा सुर्यकांत माळी, श्रीमती लक्ष्मीबाई
जरग विद्यामंदिर जरगनगर शाळेची विद्यार्थिनी वेदा दुंडाप्पा माळी यांचा गौरव करण्यात आला.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!