प्रल्हाद चव्हाण यांचा प्रथम स्मृतिदिन 17 ऑगस्टला
विविध कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर
माजी महापौर व कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त 17 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण, सत्कार आणि नूतन वास्तु प्रदान या कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे. नाथा गोळे तालीम चौक येथे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे विधान परिषदेतील उपनेते आमदार सतेज पाटील उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान खासदार शाहू महाराज हे भूषविणार आहेत.
या कार्यक्रमास आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील,
राजूबाबा आवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, महाराष्ट्र राज्य मंडप संघटनेचे अध्यक्ष दडू पुरोहित माजी आमदार सुरेश साळोखे, राजीव आवळे, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सह संपर्क प्रमुख विजय देवणे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, सुनील मोदी, भाजपाचे प्रदेश सदस्य महेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, आपचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई, कॉम्रेड चंद्रकांत यादव, प्रफुल्ल जोशी मदन चोडणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात डॉ. महादेव निकम व बाळाबाई निंबाळकर यांना प्रल्हाद चव्हाण निष्ठावान कार्यकर्ता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पीएसआय झालेल्या मनाली शिंदे हिचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. प्रल्हाद चव्हाण यांची आठवण म्हणून चव्हाण कुटुंबीयांनी बांधून दिलेल्या सचिन साळी यांना घरकुल अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रल्हाद चव्हाण युवा मंच व भागातील सर्व तरुण मंडळ, तालीम संस्था, संघटना यांनी केले आहे.