विरोधकांना शहापूरचा इतिहास ही माहित नाही
उदयसिंग पाटील यांचा टोला
इचलकरंजी : ज्यांनी शहापूर मध्ये मसोबा पालखीची मिरवणूक काढली. त्यांना गेल्या कित्येक वर्षापासून शहापूरचा इतिहास काय आहे हे देखील माहित नाही. शहापूर मधील मंदिरे व त्यांच्या विकासाबद्दल त्यांना काही माहीत नाही उलट मत मागण्याच्या उद्देशाने त्यांनी हा खटाटोप केला असल्याचा आरोप माजी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांनी केला. शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महाविकास आघाडीची उमेदवार मदत करंडे यांच्या परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, शहापूर मध्ये वाढीव भाग खंजिरी स्टेट पार्वती स्टेट तारदाळ परिसर कोरोची परिसर या ठिकाणी पोलीस स्टेशन होणे गरजेचे होते त्याचा मदन कारंडे यांनी पाठपुरावा केला व शहापूर पोलीस स्टेशन मंजूर करून घेतले कारण यांनी शहापूर गावासाठी भरभरून दिले आहे परंतु त्यांनी कधी गाजावाजा केला नाही म्हसोबा यात्रा असू दे कुस्ती मैदान विठ्ठल मंदिर असू दे किंवा लक्ष्मी मंदिर समशेर शेठ दर्गा यासाठी त्यांनी नाव न जाहीर करता भरपूर अशी मदत केली असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव म्हणाले, आजपर्यंत मसोबा पालखी शहापूर मधून मंदिरापर्यंत कधीही रिकामी गेली नव्हती ती आवाडे यांनी रिकामी नेल्यामुळे यावेळेस त्यांचीच पालखी होईल, असे म्हणाले. यावेळी मदन कारंडे, हिंदुराव शेळके, प्रकाश मोरबळे, राहुल खंजिरे, राजीव आवळे, सुहास जांभळे, सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, उदयसिंग पाटील, विनय महाजन, इमरान हावेरी, सचिन राणे, अभिजीत रवंदे, प्रियदर्शनी बेडगे, शोभा गोरे, शुभांगी माळी, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.