”
*राज्यातील मंगळवार दि ८ ऑक्टोबर रोजी जवळपास २९ जिल्ह्यात शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जबरदस्त यशस्वी*“
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी दोन्ही संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीत राज्यातील ३ लक्ष कंत्राटदार,सुबे अभियंता मजुर संस्था यांच्या ५ मागण्यासाठी शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक १ ऑक्टोबर २०२४ पासुन राज्यातील विकासाची कामे बंद करणे व राज्यात मंगळवार दि ८ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा मध्ये मध्ये एकदिवसीय जिल्हा अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय झाला होता.
आज या दोन्ही निर्णयानुसार राज्यातील जवळपास सर्वच जिल्हा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय समोर कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर संस्था यांच्या वतीने या खालील ५ मागण्यासाठी धरणे आंदोलन फार मोठ्या जबरदस्त पद्धतीने पार पडले आहे.
* *आमच्या मागणी*
१) राज्यातील सर्व विभागाची विकासाची कामे झालेल्या ४० हजार कोटींची प्रलबिंत देयकांची रक्कम तातडीने द्यावी
२) राज्य सरकारने यापुढे कोणत्याही विभागाचे कोणतेही विकासाचे काम मंजुर करण्याअगोदर सदर कामांस संपूर्ण रकमेची आर्थिक तरतूद केल्याशिवाय मंजूर करु नये.
३) शासनाने विकासाची कामे करताना संबधित कंत्राटदार यांस संरक्षण करण्याचा कायदा करावा.
४) शासनाने सर्व विभागाची छोटे छोटे कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठ्या निविदा काढणे तातडीने बंद करून सगळ्या लहान घटकांना रोजगारश्रम करण्याचे धोरण आखावे. फक्त मोठ्या कंपनी यांनाच फार मोठे करू नये.
५) शासनाने यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे शासनाच्या ३३:३३:३४ च्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर संस्था, ओपन कंत्राटदार तसेच जिप, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास या खात्याची ४०: २६ : ३४ सुबे अभियंता, मजुर संस्था, ओपन कंत्राटदार या गुण्णोतर प्रमाणात वाटप करावीत.
राज्यातील पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, भंडारा, अहमदनगर, ठाणे, पालघर, जळगाव, सिद्धुंदुर्ग, धुळे, रत्नागिरी, अमरावती,वाशिम, सातारा, मुंबई, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, लातुर, मुबंई, बीड, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, नंदुरबार, गोदिंया,रायगड,छत्रपती संभाजी नगर या जवळपास विक्रमी अशा २९ जिल्हामध्ये मोठ्या प्रमाणात फार पडले. तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवार दि १० ऑक्टोबर रोजी दोन्ही संघटनेची दुपारी ३ वाजता Online बैठक होईल व सविस्तर निर्णय होईल आजच्या आंदोलन ची जबाबदारी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे व राज्य अभियंता संघटना चे अध्यक्ष मिलिंद भोसले, महासचिव सुनिल नागराळे,संजय मैंद,सुरेश कडू पाटील, मंगेश आवळे, सुबोध सरोदे, प्रकाश पालरेचा, प्रकाश पांडव, निवास लाड, अनिल पाटील, राजेश देशमुख, कौशिक देशमुख, कैलास लांडे, कांतीलाल डुबल,अन्वर अली, सिंकदर डांगे, नितीन लावले, राजेश आपेगावकर, यांनी समर्थ पणे निभावली