महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्य भाजपा बांधकाम कामगार आघाडी कोल्हापूरच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न
कोल्हापूर दि. २० महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री, भाजपा नेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसा निमित्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सेवा कार्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपा बांधकाम कामगार आघाडी कोल्हापूरच्यावतीने भाजपा जिल्हा कार्यालयात बांधकाम कामगारांना कार्ड वितरण व आरोग्य शिबीर कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित उर्फ नाना कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला बांधकाम कामगार आघाडी अध्यक्ष संजय पाटील यांनी बांधकाम कामगारांच्या योजनांची माहिती उपस्थितांना देऊन असे कार्यक्रम सातत्याने राबवणार असल्याचे सांगितले. आजच्या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास १५० हून अधिक नागरिक, बांधकाम कामगारांनी आरोग्य तपासणी करून घेतली तसेच या आरोग्य शिबिराला हिंद ब्लड लॅबचे सहकार्य लाभले.
यावेळी अमर साठे, रविकिरण गवळी, प्रदीप उलपे, अमित टिकले, सचिन पाटील, सचिन पाटील-शाहूवाडीकर ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.