कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये पदाधिकारी बैठक संपन्न*

Spread the news

*कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये पदाधिकारी बैठक संपन्न*

कोल्हापूर ,प्रतिनिधी

मुंबई येथे  अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव माननीय श्री के सी वेणू गोपाल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी माननीय श्री रमेश चेनिथला यांच्या अधिपत्याखाली माननीय प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत निर्धारित , कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणीची बैठक कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या सूचनेनुसार व कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये  संपन्न झाली*

प्रदेश काँग्रेसने निर्देशित केलेप्रमाणे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्लॉक व तालुकास्तरीय बैठका आघाडी व सेलच्या बैठका व बूथस्तरीय रचना मजबुती आणि गतकाळात झालेली आंदोलने व येणाऱ्या काळात करावयाची आंदोलने तसेच इतर कार्यक्रम रॅली इत्यादीचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करून सर्वांना माहिती देण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असणारा मुसळधार पाऊस व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही सदस्यांनी संभाव्य अडचणी व्यक्त केल्या सदर बैठकींच्या तारखांमध्ये जरूर तर बदल करावेत परंतु लवकरात लवकर हे सर्व निर्देशित कार्य बैठका पूर्ण करून त्याचा आढावा फोटो कात्रणे इत्यादी जिल्हा काँग्रेस कार्यालयाकडे पाठवावी अशा सूचना देण्यात आल्या

यावेळी सदर बैठकीला श्री शशांक बावचकर प्रदेश चिटणीस, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर प्रदेश चिटणीस, बाळासाहेब सरनाईक प्रदेश पदाधिकारी, संजय पवार वाईकर सचिव कोल्हापूर जिल्हा काँग्रेस, तालुकाध्यक्ष सर्वश्री शंकरराव पाटील, भगवानराव जाधव, शामराव देसाई, शिवाजीराव कांबळे, जयसिंगराव हिरडेकर, संजय कांबळे तसेच शहर ब्लॉक अध्यक्ष किशोर खानविलकर, संपत चव्हाण पाटील, मोहम्मद शरीफ शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष उदय पवार, अक्षय शेळके, महिला माजी अध्यक्ष संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी, प्रदेश पदाधिकारी सरलाताई पाटील,उज्वला चौगुले, पूजा आरडे, निर्मला सालढाणा, भारती पवार, विनायक घोरपडे, भरत भारत पाटील माजी सभापती बाजार समिती, संदीप पाटील कुर्डूकर, दादासो कांबळे, विजय जाधव, प्रदीप चव्हाण, तानाजी घोडेस्वार, प्रमोद बुलबुले, अन्वर शेख, दुर्वास कदम, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, आदित्य कांबळे, संजय पटकारे, उत्तम पाटील, वैशाली महाडिक, व सर्व प्रमुख पदाधिकारी सेलचे अध्यक्ष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!