*ओबीसी समाजाचा खरा मारेकरी कॉंग्रेस पक्षच*
भाजप सरचिटणीस विजय चौधरी यांची टीका
भाजपा ओबीसी मोर्चाचा मेळावा संपन्न
कोल्हापूर
ओबीसी समाजाचा खरा मारेकरी कॉंग्रेस पक्षच आहे असा आरोप
भाजप सरचिटणीस विजय चौधरी यांची केला.
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी सामाजिक संमेलन मेळावा भाजपा जिल्हा कार्यालयात पार पडला. याप्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय भाऊ चौधरी यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती.
ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांनी आपल्या मनोगता मध्ये जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांची मांडणी करत आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा प्रदेश सरचिटणीस विजयभाऊ चौधरी म्हणाले, 2024 ची लोकसभा निवडणूक ही एखादा पक्ष किंवा उमेदवारासाठी नसून, देशाच्या भवितव्यासाठी आहे.
नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान होणं आवश्यक आहे.
केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारनं ओबीसी समाजाचं हित नेहमीच जपलंय.
त्यातून ओबीसी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत.
याउलट माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून आतापर्यंतच्या कॉंग्रेस राजवटीनं ओबीसी समाजाचं खच्चीकरण करण्यातच धन्यता मानली.
ओबीसी समाजाचा खरा मारेकरी कॉंग्रेस पक्षच आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून सुरु झालेली ही परंपरा, देशातील आजवरच्या कॉंग्रेस राजवटीनं कायम ठेवली, अशी टीका त्यांनी केली.
राज्यात ओबीसी समाजाची संख्या ६० टक्के असतानाही, या समाजाला ३० टक्के सुध्दा आरक्षण मिळू शकलं नाही, हे दुर्दैवी आहे, अशी टीका चौधरी यांनी केली.
याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आपल्या विचारातून खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून जातीयवादी विचारांची पेरणी करत आहेत. त्यातून त्यांना काय साध्य करायचंय, असा सवाल, खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षानं ओबीसी समाजाला नेहमीच झुकतं माप दिलं. केंद्रात २७ मंत्री ओबीसी समाजाचे आहेत. तर राज्यात भाजपचे २८ ओबीसी आमदार आहेत, याचा खासदार महाडिक यांनी उल्लेख केला.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानं, अबकी बार चारसो पार आणि फिर एक बार नरेंद्र मोदी पंतप्रधान हे पक्षाचं उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी, सर्वानी कामाला लागावं, असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलं.
राजे समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या १० वर्षात मोदी सरकारमुळं देशातील जनतेला न्याय मिळालाय, असे सांगत स्वयंघोषीत पुरोगामी कॉंग्रेस पक्षानं, मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षातील कामगिरीचा हिशोब मागण्यापूर्वी, कॉंग्रेस राजवटीतील कामगिरीचा हिशोब जनतेसमोर ठेवावा असे आव्हान केले.
प्रदेश सचिव महेश जाधव यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळं पक्षाला ताकद मिळाली, असं सांगितलं.
या ओबीसी मेळाव्याला जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, राहुल चिकोडे, राजसिंह शेळके, प्रमोद पाटील, अशोकराव माळी, बाळासाहेब जाधव, संतोष माळी, दीपक जाधव,महेश यादव, विद्या बनछोडे, विद्या बागडी, संध्या तेली यांच्यास कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.