खास . धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा – आम. कोरे

Spread the news

खास . धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा – आम. कोरे

वारणानगर / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांत प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती केली असुन त्यांना पुन्हा बहुमताने पंतप्रधान करण्यासाठी आपण देखील खारीचा वाटा उचलायचा आहे. म्हणुन हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा  हातकणंगले लोकसभा मतदार संघातून  भरघोस मताधिक्यासह निवडून द्यायचे आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन आम. डॉ. विनय कोरे यांनी केले. ते अमृतनगर (ता.पन्हाळा) येथे हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या  प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहातील सर्व संचालक तसेच हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!