- माझ्या वक्तव्याचा जाणीव पूर्वक विपर्यास
संजय मंडलिक
कोल्हापूर : काही कांगावखोरांनी माझ्या वक्तव्याचा जाणीव पूर्वक विपर्यास चालू केला आहे. माझे वक्तव्य कोल्हापूरची गादी अथवा लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या विषयी नाही. विद्यमान शाहू महाराज हे दत्तक आलेले आहेत.हे वास्तव असुनही माझ्या विरोधात काही विषय मिळत नसल्याने काहींनी नसता कांगावा सुरु केला आहे असा आरोप खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे.
मंडलिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने १९६२ मध्ये दत्तक वारस विरोधाला केलेल्या व्यापक जन आंदोलनाचा इतिहास आधी जाणून घ्या. पराचा कावळा करून स्टंटबाजीचा करत कांगावा करू नका. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेची दिशाभूल करू नका. असा इशारा मंडलिक यांनी दिला.
……
संजय मंडलिक यांना मतदान म्हणजे स्वर्गीय मंडलिक यांना वंदन……
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार
कडगांव- गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात.
कडगाव
राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामीत्वाचा आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जपत स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी वाटचाल केली. त्यांनी सामाजिक काम आणि श्रम करून गोरगरिबांसाठी आयुष्य झिजवले. त्यांचे प्रचंड उपकार आमच्यावर आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासातील त्यांचे योगदान मोठे आहे. प्रा संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांना वंदन करूया, असे भावनिक उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक म्हणाले, “माझी उमेदवारी मिळवण्यासाठी नामदार मुश्रीफ, खासदार महाडिक यांचे मोठं योगदान आहे. “मान गादीला- मत मोदीना” ही टॅगलाईन घेऊन निवडणुकीत उतरलो आहोत. कुस्ती निकालीच करायची आहे. केवळ शाहू महाराजांचा चेहरा पुढे करून आमदार सतेज पाटील खासदारकीही आपल्याच घरात ठेवण्यासाठी धडपडत आहेत. विरोधकांनी जिल्हयाचा कोणता विकास केला ते सांगावे.
माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील -गिजवणेकर म्हणाले,” कडगांव- गिजवणे मतदार जिल्हा परिषद मतदारसंघाची आजची ही सभा ऐतिहासिक ठरेल. प्रा. संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणायचेच हा चंग इथल्या जनतेने बांधला आहे.
यावेळी गोडसाखरचे संचालक बाळासाहेब देसाई, कडगांवच्या सरपंच अर्चना पाटील, उपसरपंच संजीवनी पाटील, नेताजी पाटील, बंटी पाटील, सुदर्शन पाटील, सदानंद पाटील, प्रकाश पताडे, किरण कदम, माया सावर्डेकर, पद्मा चिकोडे, मेघा पाटील, आनंदा पाटील-बेकनाळ, सचिन देसाई- हिरलगे, अशोक खोत-बड्याचीवाडी, आकाराम पाटील, भीमराव राजाराम- जखेवाडी, संग्राम घाडगे, सचिन सावंत, बाळासाहेब कांबळे, नूरमहम्मद बस्तवडे, पृथ्वीराज पाटील- आत्याळ, मिलिंद पाटील- बेळगुंदी, अनुप पाटील -करंबळी, के.बी.पोवार सर, संभाजी पाटील, मिलिंद पाटील, विकास पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी संजय बटकडली, बंटी पाटील, सदानंद पाटील, सतीश पाटील यांची भाषणे झाली.
स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस कडगावचे अध्यक्ष सुदर्शन पाटील यांनी केले. प्रास्ताविक नेताजी पाटील यांनी केले.
*कडगाव ता. गडहिंग्लज येथे कडगाव- गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ व महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक.
=============