*कागल तालुक्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपूया…..!*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन*
*कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात*
*कागल, *
*प्रा संजय मंडलिक यांना खासदार करून कागल तालुक्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयाच्या रुपाने लोकनेते कै. खासदार सदाशिवरावजी मंडलिक यांना वंदन करूया, असेही ते म्हणाले.*
*कागलमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते.*
*भाषणात पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्य हे प्रा. संजय मंडलिक यांना विजयाप्रत नेणारे ठरेल. योगायोगाने आजच त्यांच्या मातोश्री कै. सौ. विजयमाला मंडलिकवहिनी यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून मोठ्या चिकाटीने आणि कसोशीने श्री. मंडलिक यांना विजयी करूया. गुरुवार दि. ४ पासून जिल्हा परिषद मतदार संघनिहाय सेनापती कापशी, नानीबाई चिखली, उत्तुर, कडगाव -गिजवणे, बिद्री, सिद्धनेर्ली, कसबा सांगाव, व त्यानंतर कागल, मुरगुड व गडहिंग्लज ही शहरे, असे प्रचार सभांचे नियोजन करू.*
*प्रा . संजय मंडलिक म्हणाले, कागल तालुक्यात विकासाचे राजकारण करण्यासाठी स्पर्धा असते. माझ्या उमेदवारीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक व महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विकासासाठी एकत्र येण्याची गरज असून कागल तालुक्याचा खासदार होत असताना तालुक्यातील सर्व नेतेमंडळींनी एकत्र येण्याची गरज आहे. स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे व स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर या तालुक्याच्या पालकत्वाची जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. आपण, पालकमंत्री हसन मुश्रीफ व समरजीतसिंह घाटगे विकासासाठी एकत्र आलो आहोत. दरम्यान; माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनाही मी भेटून मदतीसाठी विनंती करणार आहे. छत्रपती शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे राधानगरी धरण बांधले. त्याच पद्धतीने काळम्मावाडी धरणासाठी कागल तालुक्यातील नेतेमंडळींनी प्रयत्न केले आहेत. आम्हीही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदारच आहोत. जिल्ह्याच्या विकासासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी माझ्या माध्यमातून दिला आहे. तळागाळात जाऊन मंत्री मुश्रीफ यांनी काम केले आहे. या निवडणुकीत व्यक्तिगत टीका झाली तर आम्हालाही थांबून चालणार नाही. तुम्ही सर्वजण माझे आई-वडील आहात. मला या निवडणुकीत आशीर्वाद द्या, असे आवाहनही प्रा. संजय मंडलिक यांनी केले.*
*मंडलिक- मुश्रीफ एकच…….!*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावे वेगवेगळी होऊच शकत नाहीत. आम्ही अनेक वर्ष एकत्र काढली आहेत. दुर्दैवाने काही मतभेद झालेही. परंतु; मनातील आत्मीयता आणि जिव्हाळा कधीच कमी झाला नाही.*
यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील- गिजवणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कागल विधानसभा अध्यक्ष वसंतराव धुरे, बाचणीचे माजी सरपंच सूर्यकांत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, प्रा. सिद्धार्थ बन्ने, गडहिंग्लजचे माजी नगरसेवक नरेंद्र भद्रापूर आदींची भाषणे झाली.*
*व्यासपीठावर बिद्रीचे संचालक रावसाहेब खिल्लारे, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, तात्यासाहेब पाटील, ॲड. जीवनराव शिंदे, दिनकर कोतेकर, नारायण पाटील, आर. व्ही. पाटील, सूर्याजीराव घोरपडे, किरणराव कदम, वसंतराव यमगेकर, राजू खणगावे, अनुप पाटील, प्रकाशभाई पताडे, गुंडेराव पाटील, विष्णुपंत केसरकर, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, दीपक देसाई, रणजीत सूर्यवंशी, सुभाष चौगुले, जयदीप पवार, संजय फराकटे, निलेश शिंदे, मयूर आवळेकर, कृष्णा पाटील, बच्चन कांबळे, प्रवीण काळबर आदी प्रमुख उपस्थित होते.*
*स्वागत राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी मानले.*
……………