दक्षिण महाराष्ट्राचा तिढा सुटणार तरी कधी?
उमेदवारीचा प्रश्न सुटत नसल्याने इच्छुक अस्वस्थ
,कोल्हापूर
दक्षिण महाराष्ट्रातील हातकणंगले, सांगली आणि सातारा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्याला रोज उद्या उद्या असाच निरोप येत असल्यामुळे उमेदवारी जाहीर होणार कधी आणि प्रचाराला सुरुवात करणार कधी असा प्रश्न इच्छुक करत आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज आणि माहितीने संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर केली. यांची उमेदवारी जाहीर केली. हातकणंगलेत महायुतीने धैरशील माने तर सांगली त संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली पण तेथे महाविकास आघाडी अंतर्गत वाद संपलेला नाही.
हातकणंगलेतून राजू शेट्टी लढणार हे निश्चित आहे. ते महायुतीचा पाठिंबा घेणार की आघाडीचा हे ठरेना. आघाडी त्यांना बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार नाही. त्यातून शिवसेना ठाकरे गट उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
सांगली मतदार संघावर काँग्रेसचा दावा कायम आहे. तेथे ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. ते काँग्रेसला मान्य नाही. पश्चिम महाराष्ट्रात एक जागा ठाकरेंना हवी आहे. नव्या राजकीय समीकरणात हातकणंगलेत शेट्टींना पाठिंबा न देण्याचा निर्णय झाल्यास तेथे सेना मैदानात उतरेल. म्हणजे हा मतदार संघ मिळाल्यास सांगलीचा तिढा सुटेल. काँग्रेसला मार्ग मोकळा होईल.
सातारा मतदार संघ भाजपला की राष्ट्रवादी अजित पवार गटाला हा वादही कायम आहे. राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला आहे. खासदार उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढण्याची शक्यता कमी आहे. यामुळे या दोन पक्षात तोडगा कधी निघणार या प्रतिक्षेत कार्यकर्ते आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दक्षिण महाराष्ट्रातील चारही मतदार संघात तिढा सुटता सुटेना. यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. श्रीमंत शाहू महाराज, शेट्टी आणि खासदार संजय पाटील प्रचारात गुंतले असताना दुसरीकडे विरोधी उमेदवारच ठरत नसल्याने ही अस्वस्थता वाढतच आहे.