.

राहुल पाटील यांच्यासाठी बांधकाम कामगार राबतील संजय सुतार : संघटनेतर्फे फुलेवाडीत महिला मेळावा

Spread the news

  • राहुल पाटील यांच्यासाठी बांधकाम कामगार राबतील

संजय सुतार : संघटनेतर्फे फुलेवाडीत महिला मेळावा

कोल्हापूर, ता. २४ : स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर मतदारसंघातील हजारो बांधकाम कामगारांसाठी केलेले काम आदर्शवत आहे. त्यांच्या समस्यांची सोडवणूक केली आहे. कै. पाटील यांच्या मदतीमुळेच अनेक बांधकाम कामगारांचे संसार फुलले याची जाण ठेवूनच करवीर विधानसभा निवडणुकीत सर्व बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय राहुल पाटील यांच्यासाठी अहोरात्र झटतील, अशी ग्वाही राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटना सचिव संजय सुतार यांनी दिली. दरम्यान राहुल पाटील यांनी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेतर्फे फुलेवाडी येथील दत्त मंगल कार्यालयात आयोजित बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शालाबाई जाधव (सावरवाडी) होत्या.

सुतार म्हणाले, ‘स्व. आमदार

पाटील यांनी केलेले काम न विसरण्यासारखे आहे. राजकीय हेतूने बांधकाम कामगारांच्या कॅम्पला विरोध करणाऱ्यांना जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’

राहुल पाटील म्हणाले, ‘पी. एन. पाटील यांनी समाजातील प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपले राजकीय आयुष्य खर्ची केले. त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालविण्यासाठी सर्वांचा पाठबळरुपी आशीर्वाद माझ्यासोबत अखंड राहू दे.’ ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील, पंचायत समिती माजी सभापती अश्विनी धोत्रे, तेजस्विनी राहुल पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कवठेकर, सुनीता सुतार, अरुणा कुंभार, सविता पाटील, आशा लबडे, गीतांजली देसाई, गगनबावडा तालुकाध्यक्ष मनीषा खेडकर, विजय भोसले, शिवाजी तळेकर, बुद्धिराज पाटील उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!