आमदार डॉ.विनय कोरे यांच्या वाढदिवसास कार्यकर्त्यांनी राबवले विविध उपक्रम : रक्तदान शिबीर
वारणा दूध संघात जातीवंत म्हैस वितरण शुभारंभ : मोहन येडूरकर
वारणानगर
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.विनय कोरे यांच्या वाढदिवसांस सोशल मीडिया तसेच गावागावातून प्रमुख चौकात शुभेच्छा देण्यासाठी लागलेले डिजीटल फलक, शाळा महाविद्यालयात झालेले कार्यक्रम, विकास कामांचा शुभारंभ असे विविध उपक्रम कार्यकर्त्यांनी संस्थानी राबविले.
वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा केलेल्या जातीवंत म्हैस संवर्धन व पैदास योजनेतून दूध उत्पादकांना
डॉ. कोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संघाकडून उत्पादकांना म्हैस वितरण करण्यात आले.
या योजनेच्या माध्यमातून दूध उत्पादकांना गोठ्या वरून मुऱ्हा व मेहसाना जातीच्या म्हैस माफक दरात खरेदी करता येणार असल्याने शेतकऱ्यांकडून म्हैस मागणीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून म्हैशी पाहण्यास व खरेदी करण्यास गर्दी होत आहे. संघाकडून विक्री करण्यात येणाऱ्या म्हैशींना विमा संरक्षण तसेच ४२ हजार रुपये अनुदानही संघाकडून देणेत येणार आहे. अधिकाधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संघाकडून म्हैस खरेदी कराव्यात असे आवाहन संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले.
यावेळी संघाचे संचालक शिवाजी जंगम,अभिजित पाटील, के.आर. पाटील,अकौंटस् मॅनेजर सुधीर कामेरीकर,संकलन व्यवस्थापक अशोक पाटील,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे. बी. पाटील, डॉ. एन्. एस्. वडजे,सिव्हील व्यवस्थापक शरद शेटे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
वारणा शिक्षण मंडळात विविध उपक्रम : ६५४ रक्तदात्यांचा सहभाग
श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आ,डॉ. विनय कोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षण मंडळांतर्गत सर्व संस्थांमधून विविध कार्यक्रम पार पडले.आयोजीत रक्तदान शिबिरात
६५४ रक्तदात्यांनी सहभाग घेतला त्यांना पेनड्राईव्ह भेट देणेत आला
महात्मा गांधी रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करणेत आले.शिक्षण मंडळ संस्था परिसरामध्ये विद्यामंदिर, विद्यालय, इंग्लिश अँकॅडमी,मिलिटरी अकॅडमी, सीबीएसई स्कुल,फार्मसी कॉलेज, आय.टी.आय. व इंजिनियरींग कॉलेज याठिकाणी ५४ वृक्षांचे वृक्षारोपण करणेत आले.दि. २ ते ४ आक्टोंबर या कालावधीत प्लॅस्टिक मुक्त परिसर करणेसाठी सर्व संस्थांमध्ये स्वच्छता अभियान राबविणेत आले. तसेच मुलींमध्ये एच.बी.काऊंट तपासणी करुन सकस आहारासाठी मार्गदर्शन केले.
या सर्व उपक्रमांसाठी शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी
प्र. प्राचार्य डॉ.डी.एन्.माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा.डॉ.ए.एम. शेख,फार्मसी प्राचार्य, डॉ. किरण पाटील,पॉलिटेक्निक प्राचार्य पी.आर.पाटील, आय .टी. आयचे उपप्राचार्य राजेंद्र कापरे, , विकास चौगुले,डॉ. सौरभ बोरचाटे, प्राचार्य टी.बी. ऱ्हाटवळ,आर.बी. नाईक व सर्व शाखा प्रमुख व विभाग प्रमुख, प्राध्यापक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
——————————————-