शिक्षणातून समाजाची प्रगती साधणारे - शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

Spread the news

शिक्षणातून समाजाची प्रगती साधणारे – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

                     श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

                             यांचा 37 वा स्मृतिदिन समारंभ दि.8 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न्‍ होत आहे त्यानिमिताने

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे म्हणजे एक ध्येयवादी शिक्षक, शिक्षण प्रसारातून समाजपरिवर्तनाचे स्वप्न् पाहणारा एक दृष्टा समाजचिंतक.  आज विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रुपाने व शैक्षणिक कार्यविस्ताराने डॉ.बापूजींच्या स्मृती चिरंतन राहिल्या आहेत. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी  सामाजिक व शैक्षणिक प्रवाहातून बाजूला पडलेल्या समाजाला शिक्षणाची आणि स्वत्वाची जाणीव करुन दिली. बुध्द, कबीर, फुले, राजर्षी शाहू, व आंबेडकरवादी विचारांचा वारसा समाजाला प्राप्त्‍ होऊन समाज विवेकी व विचारशील बनावा या हेतून त्यांनी शिक्षणसंस्था उभी करुन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगीरी केली आहे. शिक्षणाव्दारे सुशिक्षित व सुसंस्कारी नागरिक घडवून समाजाची प्रगती केली आहे.

आज या संस्थेचे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात कला,क्रीडा,साहित्य्,सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त्‍ करत आहेत. सत्य्, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूकीस आळा या पंचतत्त्वाचा स्वीकार करुन देश विदेशात कार्यरत आहेत.  डॉ.बापूजींच्या या शैक्षणिक कार्यात त्यांच्या पत्नी संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांचे योगदान मोठे आहे.

 “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”  या उदात हेतुने प्रेरित होऊन  शिक्षणमहर्षी  डॉ. बापूजी साळुंखे यांनी 1954 साली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपत  आज या संस्थेचा वटवृक्ष बहरला असून 410 संस्कार केंद्रांमधून 10,000 गुरुदेव कार्यकर्ते प्राथमिक, माध्यमिक, उच्च्‍ माध्यमिक, पदवी व पदव्युतर वर्गांसाठी ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. आणि अडीच लाख विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत.  प्राथमिक शिक्षणापासून पदव्युतर  शिक्षणापर्यंत शिक्षण देणाऱ्या अनेक शाखा आज आपले  स्वतंत्र अस्तित्व्‍ जपून आहेत.

शिक्षणमहर्षी  डॉ.  बापूजींनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य अमर आहे.  त्यांच्या कार्याचे स्मरण सर्वाना व्हावे, त्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून संस्थेमार्फत 8 ऑगस्ट् हा स्मृतिदिन  म्हणून जागवला जातो. या  निमित्ताने बापूजींच्या तत्वज्ञानाला, विचाराला आणि कार्याला उजाळा देण्याची संधी मिळत आहे. गुरुवार दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर  यांचे विकसीत भारत आणि शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान  संस्थेच्या वतीने आयोजित केले आहे. यावेळी  संस्थेच्या विविध शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे आहेत.  तसेच दुपारच्या सत्रामध्ये मुख्याध्यापकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही नेहमीच काळानुरुप स्वत:च्या शैक्षणिक ढाच्यात गुणवत्तापूर्ण बदल घडवित गतिमान राहिली आहे. पारंपारिक शिक्षणाबरोबर इंजिनिअरींग कॉलेज, नर्सिंग कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, बी.व्होक. बीबीए, एम.बी.ए. बीसीएस, बीसीए, एम.सी.ए. असे अनेक कोर्सेस सुरु करुन काळानुरुप वाटचाल करीत आहे. संस्थेच्या प्रगतीची ही गती अशीच सुरु ठेवण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे व संस्था सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ.शुभांगी मुरलीधर गावडे या कार्यतत्पर आहेत. त्याचबरोबर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. कौस्तुभ गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून  संस्थेच्या प्रांगणात डॉ. बापूजी साळुंखे  इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी  पदवी अभियांत्रिकी महाविद्यालय,  सावित्रीबाई  फुले  कॉलेज ऑफ  नर्सिंग अभ्यासक्रमही सुरु आहे.

 

शिक्षकांनी नेहमी बापूजींच्या सत्य्, सेवा व त्याग या मूल्यांची जपणूक करत विद्यार्थ्यांवरही या सुसंस्काराचा प्रभाव पाडून बापूजींना अभिप्रेत असलेले सुसंस्कारी विद्यार्थी घडविणे हीच खरी बापूजींना आदरांजली ठरणार आहे. बहूजनांच्या शिक्षणासाठी आपले सर्व आयुष्य्‍ समर्पित केलेले शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे हे सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांच्या मनामनात व घराघरात पोहोचले आहेत.

हितेंद्र  सुर्याजीराव  साळुंखे

        सहायक ग्रंथपाल, विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर


Spread the news

You may also like

error: Content is protected !!