विवेकानंद कॉलेजमध्ये नवीन एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रम
30 तारखेला होणार सयाजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर, प्रतिनिधी
दैदिप्यमान आणि दर्जेदार शैक्षणिक परंपरा असलेल्या संस्थेच्या विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे सदर शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ए.आय.सी.टी. ई. (AICTE) मान्यता प्राप्त एम.बी.ए (MBA) आणि एम.सी.ए (MCA) हे पदव्युत्तर पदवी कोर्सेस सुरू होत आहेत. सदर दोन्ही कोर्सेस हे शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूरशी संलग्न आहेत. दोन्ही कोर्सेसची प्रवेश क्षमता ६० आहे अशी माहिती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, संस्थेच्या व्यवसायिक शिक्षण समूहाचे संचालक श्री. वीरेन भिर्डी, एम.बी.ए डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा. विराज जाधव आणि एम.सी.ए डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा. विजय पुजारी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी सांगितले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्थापित केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर गेली ७० वर्षे शिक्षण प्रसाराचे कार्य करत असून एक विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय शिक्षण संस्था म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा पावली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४०० हून अधिक संस्कृति केंद्रांमधून शिक्षण प्रसाराचे कार्य अखंडपणे चालू आहे. संस्थेतून शिक्षण प्राप्त करून देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये आज अनेक विद्यार्थी नेतृत्व करत आहेत. बदलत्या काळानुसार भविष्याची गरज ओळखून नवनवीन अभ्यासक्रम समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने धोरणात्मक पावले उचलली आहेत
.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे 1964 मध्ये स्थापन झालेले विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कॉलेजांपैकी एक म्हणून ओळखले जाते. विवेकानंद कॉलेजला नैक “ए” ग्रेड मान्यता प्राप्त आहे आणि युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन (यूजीसी) तर्फे दोन वेळा “कॉलेज विथ पोटेन्शिअल फॉर एक्सलन्स” गौरवण्यात आले आहे. डीबीटी, भारत सरकारच्या “द स्टार कॉलेज” योजनेमध्ये विवेकानंद कॉलेजचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठ ही सध्या जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. तसेच भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेमध्ये येण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. अनेक परदेशी कंपन्या भारतामध्ये त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करत आहेत. नवीन नवीन ब्रँड सुरू होत आहेत. असे असताना भविष्यामध्ये भारताला मोठ्या प्रमाणामध्ये स्किल्ड मॅनेजर्सची आणि लीडर्सची गरज भासणार आहे. सध्या असलेली स्किल्ड मॅनपावरची कमतरता लक्षात घेता संस्थेने या शैक्षणिक वर्षापासून एम.बी.ए आणि एम.सी.ए हे दोन पदव्युत्तर पदवी कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कोर्सेस मधून फक्त स्किल्ड मॅनेजर्सच नाही तर ओनर्स तयार करण्याचा मानस संस्थेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष श्री. कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला. स्टार्टअप साठी लागणारे पोषक वातावरण हे दोन्ही कोर्सेसमार्फत देण्याचा संस्थेचा हेतू राहील. एम. बी. ए प्रोग्राम अंतर्गत कॉलेज मार्केटिंग, एचआर, बँकिंग अँड फायनान्स, ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बिझनेस ॲनॅलिटिक्स स्पेशलायझेशन्स ऑफर करत आहे.
विवेकानंद कॉलेज स्वायत्त्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ओरिएंटेड अद्यायावत अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध आहे. विवेकानंद कॉलेज तर्फे नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप व जॉबची संधी उपलब्ध आहे. 100% प्लेसमेंट सहाय्य देण्याची हमी संस्थेमार्फत देण्यात आली आहे. सर्व सोयीयुक्त सुसज्ज क्लास रूम्स, अत्याधुनिक लैंग्वेज आणि इंटरनेट लॅब उपलब्ध आहे. उच्चशिक्षित अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापकांची टीम एम.बी.ए आणि एम.सी.ए साठी उपलब्ध आहे. कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांसाठी माफक दरात वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे.
सदर दोन्ही कोर्सेसना राज्य व केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजना लागू आहेत. या व्यतिरिक्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनातर्फे संस्थास्तरीय डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम मेरीट शिष्यवृत्ती आणि श्री स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. बहुजन समाजतील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण अगदी माफक शुल्कामध्ये उपलब्ध व्हावे असा उद्देश या शिष्यवृत्तीच्या निर्मितीमागे आहे.
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम मेरीट शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या एम.बी.ए/ एम.सी.ए कोर्ससाठी प्रवेश घेतील त्यांना त्यांच्या एम.बी.ए/ एम.सी.एच्या महा-सी.ई.टी (MAH-CET) मध्ये मिळवलेल्या पर्सेंटाइल गुणांनुसार शैक्षणिक फी मध्ये सवलती मिळतील. या योजेअंतर्गत एम.बी.ए/ एम.सी.ए प्रवेश परीक्षेमध्ये 85 पर्सेंटाइल किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्स कालावधीमध्ये 100% ट्युशन फी माफ होईल. तसेच एम.बी.ए/ एम.सी.ए प्रवेश परीक्षेमध्ये 75 ते 84.99 पर्सेंटाइल इतके गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्स कालावधीमध्ये 75% ट्युशन फी माफ होईल. आणि एम.बी.ए/ एम.सी.ए प्रवेश परीक्षेमध्ये 65 ते 74.99 पर्सेंटाइल गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्स कालावधीमध्ये 50% ट्युशन फी माफ होईल.
श्री स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विवेकानंद कॉलेजच्या एम.बी.ए / एम.सी.ए कोर्ससाठी प्रवेश घेतले नंतर ट्युशन फी मधील रुपये पंधरा हजार (15,000/-) प्रती वर्ष इतके शैक्षणिक शुल्क संपूर्ण शैक्षणिक कालावधीसाठी माफ होणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी संस्थेने सुमारे 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभय कुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले.
एम.बी.ए ॲडमिशन संदर्भात प्रा. विराज जाधव 8421955828, एम.सी.ए ॲडमिशन संदर्भात प्रा. विजय पुजारी 8669032554 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.