सी ए परीक्षेत सौरभ पाटील प्रथम
कोल्हापुरात झाले 40 विद्यार्थी सी.ए
मुक्तेश्वरी शिंदे यांचे दणदणीत यश
कोल्हापूर, प्रतिनिधी चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल ११ जुलै रोजी जाहीर झाला. मे २०२४ मध्ये झालेल्या या परीक्षेस कोल्हापूर मधून ३२५ विद्यार्थी बसले होते. यामधून ४० विद्यार्थी सीए झाले. यापैकी कोल्हापूर विभागातून *सौरभ कुंडलिक पाटील* यांनी *प्रथम क्रमांक* मिळवला तर *अदिती विनायक पिसे* यांनी *दुसरा क्रमांक* तर *ओंकार अनिल चव्हाण* यांनी *तिसरा क्रमांक* तसेच *ऋग्वेद अभिजित कपडेकर* यांनी *चौथा क्रमांक* तर *स्नेहल दिपक घोरपडे* यांनी *पाचवा क्रमांक* पटकावला.
महावीर इंग्लिश स्कूल आणि कॉमर्स कॉलेजमध्ये शिकलेल्या मुक्तेश्वरी सिद्धेश्वर शिंदे हिने या परीक्षेत दणदणीत यश मिळवले. तिला राजेश लोहिया व सिद्धेश्वर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर अनुष्का किरण चौगुले, ऋतुजा अलका अनिल चौगुले, विक्रम तुकाराम पाटील, प्रथमेश संजय सातोस्कर, पिंकी सुनील वाधवाणी, इम्रान मौला पठाण, अदिती उद्धव संकपाळ, सोनाली दिलीप जाधव, साक्षी सूर्यकांत माने, प्रियांका भीमराव कदम, प्रणव मकरंद कुलकर्णी, भावेश प्रभुलाल पटेल, तेजस विजय खाडे, अक्षय जयसिंग पाटील, श्रुती उमेश गायकवाड, श्रेया मनोज अडके, प्रतिभा योगेश नाळे, उमरावती जक्काप्पा पाटील, आशीर्वाद अनंत कुलकर्णी, मृणाल किरण तेलंग, अवधुत आनंद नार्वेकर, मुक्तेश्वरी सिध्देश्वर शिंदे, तेजस किरण गांधी, अनिकेत विद्याधर शेंडुरे, स्वरूप सुभाष पाटील, रोहीत रमेश पाटील, युवराज हंबीरराव सावंत पाटील, शिवानी नरेंद्र कुलकर्णी, सृष्टी संजीव भोसले, मानसी यशवंत पाटील, निखिल जिनेंद्र डोर्ले, सोपान चंद्रशेखर सावंत, अश्विन भरत पटेल, यशपाल सर्जेराव पाटील, अक्षय ताडे हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले. .
त्याचबरोबर *ईन्टरमेडीएट (द्वितीय वर्ष)* चा हि निकाल आज जाहीर झाला यामध्ये कोल्हापूर विभागातून *जय संजीव करोशी* यांनी *प्रथम क्रमांक* आणि *देशात ४९ वा क्रमांक* मिळवून कोल्हापूरचे नाव लौकिक केले.