शाहू महाराजांच्या प्रचारार्थ एक मे रोजी शिव-शाहू निर्धार सभा
गांधी मैदानात होणार रेकॉर्ड ब्रेक गर्दी
सभेचे नियोजन जोरात
सभा यशस्वी करण्याचा निर्धार
आमदार सतेज पाटील जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे
यांनी केली सभा स्थळाची पाहणी
कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभेचे इंडिया, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ एक मे रोजी गांधी मैदान येथे भव्य शिव शाहू निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेची तयारी जोरात सुरू असून सभेला मोठी गर्दी करण्याचे नियोजन आहे ही सभा यशस्वी भव्य सभा यशस्वी करूया असे आवाहन आमदार सतेज पाटील व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ सध्या जिल्हाभर जोरदार प्रचार सभा पदयात्रा कोपरासभा भेटीगाठीत सुरू आहेत महाविकास आघाडीचे नेते प्रमुख कार्यकर्ते मतदाराची संवाद साधून शाहू महाराजांना विधी करण्याचे आवाहन करत आहेत.
या प्रचाराचा एक भाग म्हणून एक मे रोजी गांधी मैदान येथे भव्य शिव शाहू निर्धार यात्रा सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेच्या नियोजनासाठी सोमवारी सकाळी आमदार सतेज पाटील यांनी बैठक घेतली यावेळी आमदार पाटील यांच्यासह माजी आमदार माणूस राजे आमदार जयश्री जाधव यांच्या यांनी सभेच्या नियोजनाबाबत विविध सूचना केल्या.
या सभेत बाबत बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, या सभेची माहिती लोकांच्या पर्यंत पोहचवा. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना या सभेसाठी मोठ्या संख्येन उपस्थित ठेवावे.
या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ होणारी ही भव्य सभा यशस्वी करूया असे आवाहन केले. गेली 25 दिवस आपणं सर्व जण प्रचारात आहोत. सोशल मीडियावरून आता काहीही अफवा पसरवण्यात येतील. मात्र येणाऱ्या काळात सर्वांनी दक्ष राहून काम करुया. आपापल्या भागातील लोकांच्या पर्यंत या सभेची माहिती पोहचवा. लोकांना या सभेसाठी निमंत्रित करा अस आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी बैठकीत केले.
या सभेसाठी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यासह इंडिया आघाडीतील, घटक पक्षातील प्रमुख नेते व्यासपीठावर असतील. पाच वाजता सभा सुरु होईल. त्यामुळं सभे पूर्वी कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी यावं. अशा सूचनाही माजी आमदार मालोजीराजे यांनी केल्या.
दरम्यान यावेळी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी मैदानाच्या ठिकाणी पाहणी केली. येणाऱ्या लोकांच्या करिता वाहन पार्किंग व्यवस्था, लोकांची बसण्याची व्यवस्था , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी बाबत त्यानी माहिती घेवून सूचना केल्या. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर प्रमुख आर के पोवार, शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेवक आर.डी. पाटील, राजू लाटकर, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड दिलीप पवार, चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, बहुसंख्य माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.