फुलेवाडी रिंग रोड परिसरातील उपनगरे शाहू छत्रपतींच्या जयजयकाराने दुमदुमली आमदार ऋतुराज पाटील यांची पदयात्रेत हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the news

फुलेवाडी रिंग रोड परिसरातील उपनगरे शाहू छत्रपतींच्या जयजयकाराने दुमदुमली

आमदार ऋतुराज पाटील यांची पदयात्रेत हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; महागाई-बेरोजगारीचा जनक भाजपला गाडण्याचा निर्धार

कोल्हापूर : इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख व माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली आज सकाळच्या सत्रात फुलेवाडी रिंगरोड परिसरातील विविध वसाहतींमध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. भाजपच्या राजवटीतील महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेल्या महिला व युवकांसह नागरिकांनी या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या जयजयकाराने फुलेवाडी रिंग रोड परिसर दुमदुमून गेला.
सकाळी नऊच्या सुमारास राधानगरी रोड शेजारील महिपतराव बोंद्रे नगर येथील जोतिबा मंदिरापासून पदयात्रेला सुरूवात झाली. प्रारंभी तेथे जमलेल्या नागरिकांशी ऋतुराज पाटील यांनी थेट संवाद साधला. ते म्हणाले, ही निवडणूक एखाद्या प्रभागाची नसून देशाची आहे. महागाई, बेरोजगारीसह असंख्य प्रश्‍नांना गेल्या दहा वर्षांत भयानक स्वरूप प्राप्‍त झाले असून आता या सर्व प्रश्‍नांवर उत्तरे शोधण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवन सुखा-समाधानाचे करण्यासाठी इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर येणे गरजेचे आहे. देशाचे धोरण ठरविणार्‍या व निर्णायक वळणावर होत असलेल्या या निवडणुकीत कोल्हापूरचे उमेदवार म्हणून शाहू छत्रपतींना विक्रमी मताधिक्क्याने निवडून द्यायचे आहे. आमदार सतेज पाटील आणि माझ्यावर आजपर्यंत जसा तुम्ही विश्‍वास ठेवून श्रद्धेने पक्षहित जपले व आम्हाला राजकारणात बळ दिले तीच श्रद्धा व तोच विश्‍वास कायम ठेवावा. या निवडणुकीत आपण सर्वांनी स्वतः उमेदवार आहे असे समजून घरोघरी जाऊन शाहू छत्रपती यांना अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रयत्नशील राहायचे आहे.
दरम्यान, या पदयात्रेत अनेक ठिकाणी महिलांनी आमदार ऋतुराज पाटील यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. सकाळी जोतिबा मंदिरामध्ये दर्शन घेऊन सुरू झालेली ही पदयात्रा निचितेनगर, लक्ष्मीबाई साळोखे नगर, कणेरकरनगर, सत्याई नगर, न्यू कणेरकर नगर, नरसिंह कॉलनी, दत्त कॉलनी, अहिल्याबाई होळकर नगर, चिंतामणी पार्क, माऊलीनगर आदी परिसरांमध्ये फिरून गंगाई लॉन येथे पदयात्रेचा समारोप झाला.
या पदयात्रेत किरण पाटील, प्रकाश भोपळे, नंदकुमार पिसे, संतोष तोडकर, शिवाजी पाटील, दीपक धोंड, शैलेश भालकर, अतुल पाटील, गणेश मोरे, अनिकेत कांबळे, ऋतुराज इंगळे, राहुल पाटील, पापा साळोखे, समरजित जगदाळे, विजय इंगवले, कृष्णा किरूळकर, दिनकर पाटील, आदित्य कांबळे, बाजीराव टाकळे आदींनी सहभाग घेत ही पदयात्रा यशस्वी केली.

 

आमदार ऋतुराज यांनी नाचवली सासनकाठी!

पदयात्रेची जेथून सुरूवात झाली तेथे जोतिबा मंदिरात चैत्र यात्रेचा उत्सव सुरू आहे. पदयात्रेपूर्वी उपस्थित कार्यकर्त्यांसमवेत आमदार ऋतुराज पाटील यांनी हलगी-घुमक्याच्या तालावर सासनकाठी नाचविली व चैत्र यात्रेचा आनंद घेत लगेचच पदयात्रेला सुरूवात केली. यावेळी बोलताना किरण पाटील यांनी जोतिबाचा गुलाल शाहू छत्रपतींच्या विजयाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांवर पडेल असा विश्‍वास व्यक्‍त केला.
………………

 

भूलथापांना विटलेली जनता भाजप सरकारचा कडेलोट करणार : डॉ. नंदाताई बाभूळकर

भाजप सरकारच्या भूलथापांना जनता आता विटली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सरकारचा जनता कडेलोट करणार हे निश्‍चित, असा विश्‍वास डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यातील मलगेवाडी, बोंजुर्डी, अडकूर, गणुचीवाडी या गावांचा दौरा केला. त्यावेळी मतदारांशी संवाद साधताना डॉ. बाभूळकर पुढे म्हणाल्या, शेजारच्या कर्नाटक राज्यात काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. लवकरच कर्नाटकात गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रूपये मिळणार आहेत. याउलट भाजप सरकार हे केवळ भूलथापा देत आले असून जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांपासून पळ काढत आहे. चंदगडमध्ये काजूचे दर 160, 140 रुपयेवरून 80 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गॅसचे दर 400 वरून 1100 रूपयांवर पोहोचले आहेत. खतांचे दरात मोठी वाढ झाली आहे. विजेच्या दरात 12 टक्के दरवाढीचा फटका लवकरच सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. असे हे भाजपचे भाजपचे फसवे सरकार पराभूत करा.
गावागावांत महिलांनी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी त्यांनी महिलांशी विविध विषयांवर, समस्यांवर चर्चा केली, मनमोकळ्या गप्पागोष्टी केल्या.तसेच त्यांनी अडकूर येथे बबनराव देसाई, बाबा अडकूरकर, जयवंत अडकूरकर, रत्नप्रभा अडकूरकर, राहुल देसाई अडकूरकर, धोंडीबा दळवी, डॉ. मलिक बाबालाल चिंचणेकर यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या.
यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, शिव-शाहुंचा विचार आणि विकासाची दूरदृष्टी घेऊन लोकाग्रहास्तव महाविकास व इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज निवडणुकीला उभे आहेत. महाराजांचा विचार, अभ्यास व अनुभव हा चंदगडच्या विकासाला नक्‍कीच गती देईल. चंदगडकरांनी शाहू छत्रपतींना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे.
या प्रचार दौर्‍यास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, राजश्री देसाई, माजी पंचायत समिती सदस्या विद्या पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रूपाताई खांडेकर, नंदिनी पाटील, कोवाडच्या सरपंच अनिता भोगण, संतोष सुतार, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अनिल दळवी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, तालुका युवक अध्यक्ष नितीन फाटक, महिला तालुकाध्यक्षा दीपा पाटील, शांता जाधव, डॉ. विजयकुमार कांबळे, अशोक जाधव, सागर पाटील, राहुल देसाई, राधिका शिवगोंडे, साधना शिवगोंडे, सारिका पाटील, संगीता गुडवळेकर, सुलाबाई सुतार, डॉ. सदानंद गावडे, सूरज माने, एकनाथ वाके, गणेश बागडी, संतोष पाटील आदीसह कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!