Spread the news

महाराष्ट्र शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संच मान्यता धोरणा विरोधात शैक्षणिक व्यासपीठ तीव्र आंदोलन छेडणार

आमदार जयंत आसगावकर
कोल्हापूर

– महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी शाळांच्या संच मान्यतेचा काढलेला आदेश अन्यायकारक असल्याने या आदेशाविरुद्ध कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिक्षक आमदार  जयंत आसगावकर यांनी  प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे झालेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत जाहीर केले.  कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड यांचे अध्यक्षते खाली संपन्न ही बैठक झाली
15 मार्च 2024 च्या शाळांच्या संच मान्यतेची कार्यवाही महाराष्ट्र शासनाने केल्यास शिक्षण क्षेत्राचे प्रचंड नुकसान होणार आहे एक ते वीस पटाखालील असंख्य शाळा बंद होणार असून हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत तसेच अनेक शाळातील मुख्याध्यापकांची पदे रद्द होणार आहेत शाळांना कला क्रीडा व व्यवसाय शिक्षण देणारे शिक्षक पुरेशा प्रमाणात प्राप्त होणार नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे म्हणून या आदेशाला शैक्षणिक व्यासपीठाचा विरोध असून हा शासन आदेश रद्द होणे आवश्यक आहे. नाहीतर त्याविरुद्ध कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या सभेत शैक्षणिक व्यासपीठाच्या अनेक सदस्यांनी आपापली मते व्यक्त करून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली. आभार प्रा. सीएम गायकवाड यांनी मानले.
या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड,
डॉ. के.जी. पाटील, प्रा.विनय पाटील,सविता पाटील. सुरेश संकपाळ. व्ही. जी.पोवार, बाबासाहेब पाटील, राजाराम वरुटे, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत, आर वाय पाटील, राजेंद्र पाटील, रवी कुमार पाटील, उमेश देसाई, राजेश वरक,उदय पाटील,, के एच भोकरे, सुदेश जाधव,श्रीधर गोंधळी,प्रभाकर हेरवाडे, प्रसाद पाटील,आर डी पाटील,मनोहर जाधव, संतोष आयरे, अरुण मुजुमदार, श्रीकांत पाटील. सुंदर देसाई, एस.जी.पाथरे,आर बी पाटील, उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!