*अक्षेपार्ह विधानाबाबत निवडणूक विभागाकडून धनंजय महाडिक यांना नोटीस*
कोल्हापूर, दि. १० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचार संहिता १५ ऑक्टोंबर, २०२४ पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.
काँग्रेसच्या महिलांचे निवेदन
आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल खासदार महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन काँग्रेसच्या महिला पदाधिका-यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिले. महाडिक यांनी महिलांचा अपमान करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबत दिलगिरी व्यक्त करताना वोट जिहादचा उल्लेख केला. याबाबत खासदार महाडिक यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मानसिंग पाटील आणि राजू मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलांनी केली. यावेळी अंजली जाधव, भारती पोवार आणि संध्या घोटणे उपस्थित होत्या.
………………..