*NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल, परंपरा कायम.*
केंद्र शासना मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षा *(NMMS)*
मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आला असून, आपली परंपरा कायम राखली आहे.
2024-25 या शैक्षणिक वर्षाची परीक्षा 22 डिसेंम्बर 2024 मध्ये जिल्ह्यातील एकूण 72 केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेस जिल्ह्यातून 27437 इतके विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.या
शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले. *जिल्ह्याचा कोटा 437 असताना 1266 विद्यार्थी ट्रान्सफर झाले असून एकूण 1703 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. राज्यात अव्वल येण्याची परंपरा शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षण विभागाने कायम राखली आहे.*
गेल्या दोन वर्षांपासून लोकसहभागातून घेतली जाणारी सराव चाचणी मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक ,माध्यमिक शिक्षण विभागाचे नियोजन यामुळे 1703 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून सुमारे 12000 विद्यार्थी राज्यशासना मार्फत दिल्या जाणाऱ्या सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याला दर वर्षी 12000 रुपये पुढील चार वर्षे व सारथी शिष्यवृत्ती ला पात्र होणाऱ्या विद्यार्थ्याला दर वर्षी 9600 रु प्रमाणे पुढील चार वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक प्रथम तीन क्रमांकाच्या शाळांचे अभिनंदन करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा उपक्रम *शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर* याच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी गजानन उकिरडे, दिगंबर मोरे,अजय पाटील, विस्तार अधिकारी धनाजी पाटील, जयश्री जाधव, डॉ विश्वास सुतार ,डी सी कुंभार, रत्नप्रभा दबडे याच्या मार्फत मुख्याध्यापक सहविचार सभा आयोजित करून केले जात आहे.
NMMS परीक्षेतील यशा बद्दल शाळांचे संस्थापक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी मुलांचे अभिनंदन डॉ एकनाथ आंबोकर यांनी केले.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹