न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक), शांतीनगर, उचगाव येथे बेरोजगार उमेदवारांसाठी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Spread the news

  न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे बेरोजगार उमेदवारांसाठी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर,
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (MAKH) आणि न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू
पॉलिटेक्निक) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 मार्च रोजी न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक),
शांतीनगर, उचगाव येथे बेरोजगार उमेदवारांसाठी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न
झाला. मेळाव्याचे उद्घाटन मॅकचे आध्यक्ष मोहन कुशिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
रोजगार मेळाव्याची सुरुवात राज्यागीताने तसेच मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले. महारष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक
अधिकारी उमेश देशमुख, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, एनआयटीचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, प्रिन्स शिवाजीचे
चेअरमन डॉ. जी. के. पाटील यांनी उपस्थित उद्योजक व उमेदवारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.
माधुरी पाटील यांनी केले तर एनआयटी, टिपीओ प्रा. किरण वळीवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रवी साखरे, संजय पेंडसे, मॅक संचालक, एनआयटी अधिष्ठाता डॉ. नितीन
पाटील, रोजगार मेळावा कक्षप्रमुख किशोर जाधव, रामचंद्र पांढरे, अनिता कोळी, अमोल जाधव, संभाजी पोवार,
अभिजित पाटील व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
मेळाव्यात एकूण 22 उद्योजकांनी 635 रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला. मेळाव्यास 319 उमेदवार उपस्थित होते.
उमेदवारांनी विविध पदांसाठी 354 मुलाखती दिल्या. त्यापैकी 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
सहभागी कंपन्यांकडून हा रोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल आभार मानण्यात आले, अशी माहिती श्री. करीम
यांनी दिली.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!