सागर बगाडे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, पाच सप्टेंबरला नवी दिल्लीत वितरण

Spread the news

सागर बगाडे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, पाच सप्टेंबरला नवी दिल्लीत वितरण
कोल्हापूर :
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४’ कोल्हापुरातील सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड
ज्युनिअर कॉलेजमधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी
या पुरस्काराची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील दोघा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये कोल्हापूरचे सागर
बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे. तर देशभरातील ५० शिक्षकांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार
आहे. पाच सप्टेंबर २०२४ रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यासंबंधीची माहिती या विभागाचे
सहसचिव अनु जैन यांनी दिली आहे.
विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून बगाडे यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन, त्यांच्याशी समरस होऊन अध्यापन करणारे
शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. मूळत:कलाशिक्षक असलेल्य बगाडे यांना विविध विषयात रुची आहे. ते नृत्यदिग्दर्शक आहेत. लेखन
करतात. अभिनायची आवड आहे. शालेय मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करतात.
दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित स. म. लोहिया हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना ते विविध सामाजिक संस्थेशी
निगडीत आहेत. संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी ते स.म. लोहिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ऐतिहासिक
प्रसंगावर आधारित नाटिका सादर करतात. सार्थक क्रिएशन्स या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जीवनाला सुरुवात करुन मोठे यश प्राप्त केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शून्यातून
सुरुवात करत शिक्षक, कलाशिक्षक, नृत्यदिग्दर्शक ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा प्रवास थक्क करणारा आहे. रोख ५० हजार रुपये,
रौप्यपदक व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!