नजीकच्या काळात महाधुरळाची ख्याती महाराष्ट्रभर पोहोचेल- वर्धापनदिनी मान्यवरांच्या सदिच्छा

Spread the news

  1. ­
  1. नजीकच्या काळात महाधुरळाची ख्याती महाराष्ट्रभर पोहोचेल- वर्धापनदिनी मान्यवरांच्या सदिच्छा
    कोल्हापूर : ‘विश्वासार्हता, अचूकता, निष्पक्षता आणि निर्भीडपण या सुत्रावर आधारित पत्रकारिता ही वाचकांची पसंतीस उतरते. पत्रकार
    गुरुबाळ माळी यांनी या चारही सुत्रांचा अवलंब करत कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय घडामोडी, पडद्यामागचे राजकारण
    ‘महाधुरळा’ चॅनेलच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले. राजकीय घडामोडीवर भाष्य करणारे ‘महाधुरळा’या चॅनेलची ख्याती नजीकच्या काळात
    महाराष्ट्रभर पोहोचेल.’अशा सदिच्छा मंत्री, खासदार, आमदारासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या.
    निमित्त होतं, पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या ‘महाधुरळा’या यूट्यूब चॅनेलच्या पहिल्या वर्धापनदिनाचे. यानिमित्ताने नागाळा पार्क येथील बालाजी
    गार्डन येथे शनिवारी (१२ एप्रिल २०२५) वाचकांचा स्नेहमेळावा रंगला. खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय
    शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. तसेच केक कापून वर्धापनदिन साजरा झाला. याप्रसंगी मंत्री महोदय व
    खासदारांनी, ‘महाधुरळा’चॅनेलला शुभेच्छा दिल्या. महाधुरळा चॅनेलने वर्तविलेले राजकीय अंदाज खरे ठरत असल्याचे प्रशस्तीपत्रही त्यांनी
    दिले. काँग्रेसचे अॅड. सुरेश कुऱ्हाडे, अशोक स्वामी, भाजपचे महेश जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे
    ललित गांधी, उद्योजक सुरेंद्र जैन, आनंद माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, राहुल चिकोडे, प्राचार्य जी. पी. माळी यांची
    व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
    खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राहुल आवाडे, आमदार जयंत
    आसगावकर, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे
    जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शाहू ग्रपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील, गोकुळचे
    चेअरमन अरुण डोंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी महाधुरळा चॅनेलच्या वर्षभराच्या
    कामगिरीचे कौतुक केले. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार गुरुबाळ माळी यांनी वर्षभरातील विविध घटना, राजकीय घडामोडी व
    महाधुरळाच्या माध्यमातून प्रकाशित बातम्यांचा ऊहापोह केला. दरम्यान वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यास सायंकाळी पाच
    वाजल्यापासून नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग अशा विविध क्षेत्रातील
    मान्यवरांच्या सहभागाने ‘महाधुरळा’वरील प्रेम प्रकट झाले. वाचकांच्या उदंड प्रतिसादात सायंकाळी पाच वाजता सुरू झालेला हा स्नेहमेळावा
    रात्री नऊपर्यंत रंगला.
    शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, माजी महापौर आर. के. पोवार, महादेवराव आडगुळे, मारुतराव कातवरे, सागर चव्हाण,
    जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रा. जयंत पाटील, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर, राष्ट्रवादी अजित
    पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती महेश
    सावंत, आशिष ढवळे, मुरलीधर जाधव, संदीप कवाळे, सचिन पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, राजसिंह शेळके, ईश्वर परमार,
    महेश सावंत, इंद्रजीत बोंद्रे, प्रकाश गवंडी, सतीश लोळगे, विनायक फाळके, किरण नकाते, वैभव माने, महेश उत्तुरे यांनी शुभेच्छा व्यक्त
    केल्या. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मयूरचे डॉ. संजय एस पाटील, पदवीधर मित्रचे माणिक पाटील चुयेकर यांनी
    सदिच्छा व्यक्त केल्या. साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे, संपादक वासुदेव कुलकर्णी दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव संपादकनी कौतुकाची थाप दिली.
    शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य डी. आर. मोरे, प्राचार्य व्ही. एम. पाटील,
    विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्या डॉ.
    मंजिरी मोरे, प्रा. रघुनाथ ढमकले, डॉ. प्रताप पाटील, प्राचार्य सुरेश गवळी, प्राचार्य एस. जे. नाईक, सुनील कुमार  लवटे सागर बगाडे प्राचार्य बी एस पाटील, प्राचार्य जे.
    के. पवार, प्राचार्य बाबासाहेब उलपे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, शिक्षक नेते भरत रसाळे, शाहू शिक्षण संस्थेचे मानसिंग बोंद्रे यांच्या
    सहभागाने स्नेहमेळाव्याची शोभा आणखी वाढली. डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. नीता नरके, डॉ.
    संतोष कुलकर्णी यांच्या सदिच्छा बळ देणाऱ्या ठरल्या.
    उद्योजक व बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग हा लक्षणीय होता. बांधकाम व्यावसायिक महेश यादव, विद्यानंद बेडेकर, जयेश कदम, दौलत देसाई, बार कौन्सिलचे अध्यक्ष सर्जेराव खोत, माजी नगरसेवक अजित मोरे . प्रसाद कामत देवेंद्र दिवाण
    पारस ओसवाल, अभिजीत मगदूम, रामचंद्र भोगम, उद्योजक मोहन कुशिरे, शांतिनाथ लिंबाणी, चंद्रकांत कांडेकरी यांनी उपस्थिती राहून
    शुभेच्छा व्यक्त् केल्या.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!