*माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते
खासदार धनंजय महाडिक यांचा खुलासा
कोल्हापूर
सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल, तर त्यांची माफी मागतो.*
माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडनाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकार मुळेच यशस्वी झाली असल्याचे ठाम पणे नमूद करताना, चुकून आलेली प्रतिक्रिया आहे.
मी माझ्या वैयक्तिक , राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नी मार्फत गेली१६ वर्षे भागीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरते साठी नेहमीच सकारात्मक काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन.
महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण बाबत, आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. *तरीही माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या*
*माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील,* अशी आई अंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना करतो.
– *खासदार धनंजय महाडीक.*